Gadar 2 Movie Esakal
मनोरंजन

Gadar 2 मध्ये 'हा' अभिनेता दिसणार सकीनाच्या वडीलांच्या भूमिकेत, अमरिश पुरी यांना करणार रीप्लेस

अमरिश पुरी यांनी 2001 साली रिलीज झालेल्या 'गदर' सिनेमात सकीनाच्या वडीलांची म्हणजे अशरफ अली ही व्यक्तिरेखा साकारली होती.

प्रणाली मोरे

Gadar 2 : सनी देओल आणि अमिषा पटेलनं 'गदर २' चं प्रमोशन सुरु केलं आहे. हा सिनेमा याचवर्षी स्वातंत्र्यदिनी रिलीजसाठी मोठ्या जल्लोषात तयार आहे. सिनेमाच्या सेटवरनं अनेक व्हिडीओज आधीच व्हायरल झालेयत. त

आता चाहते हे जाणून घ्यायला उत्सुक आहेत की सिनेमात अमीषा पटेल म्हणजे सकीनाच्या वडीलांची भूमिका कोण साकारणार आहे. २००१ साली रिलीज झालेल्या 'गदर' सिनेमात अमिषाच्या वडीलांची भूमिका अमरिश पूरी यांनी साकारली होती.

अमीषा पटेलच्या वडीलांची भूमिका 'गदर २' मध्ये मनीष वाधवा साकारणार आहेत. शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमात मनीष वाधवा खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या भूमिकेची प्रशंसाही झाली आहे.

'गदर २' सिनेमात उत्कर्ष शर्मा,सिमरत कौर,गौरव चोप्रा आणि लव्ह सिन्हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं गेलं आहे. ज्यामध्ये सनी देओल आणि अमीषा पटेल दिसत आहेत.

'गदर २' तब्बल २२ वर्षानंतर सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 'गदर २' मध्ये यावेळी प्रेक्षकांना खूप नवीन गोष्टी पहायला मिळणार आहेत. पण आपण सर्वच 'गदर' मधील या तीन चेहऱ्यांना नक्कीच मिस करू.

सगळ्यात आधी बोलूया अमरिश पुरी यांच्याविषयी. अमरिश पुरी यांनी सिनेमात सकीनाच्या वडीलांची म्हणजे अशरफ अली ही व्यक्तिरेखा साकारली होती. १२ जानेवारी, २००५ मध्ये अमरिश पुरी यांचे निधन झाले.

त्यामुळे आता त्यांची जागा 'गदर २' मध्ये कोण घेणार याविषयी लोकांना उत्सुकता होती. तर आता सकीनाच्या वडीलांची भूमिका मनीष वाधवा साकारताना दिसतील.

'गदर' मधील तारा सिंगचा मित्र दरमियान सिंग ही व्यक्तिरेखा साकारणारे विवेक शौक देखील 'गदर २' मध्ये दिसणार नाहीत. कारण २०११ मध्ये त्यांचेही हार्टअटॅकने निधन झाले आहे.

त्यासोबतच 'गदर'च्या पहिल्या भागात न्यूजपेपर एडिटरची व्यक्तिरेखा साकारणारे मिथलेश चतुर्वेदी देखील सिनेमात दिसणार नाहीत. त्यांचे निधन गेल्यावर्षीच झाले आहे.

त्यासोबतच ओम पुरी ज्यांनी सिनेमाचं नरेशन दिलं होतं,आता ते देखील आपल्यामध्ये नाहीत. त्यांचे निधन २०१७ साली झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT