President Droupadi Murmu review gadar 2 sunny deol 
मनोरंजन

Gadar 2 Reaction : राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मूंना सनीचा 'गदर' पाहण्याची इच्छा! दिग्दर्शकांना सेन्सॉर बोर्डाकडून विनंती

आम्ही उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. त्यावेळी त्या फिल्म पाहणार आहेत. आमच्यासाठी ही गर्वाची बाब आहे.

युगंधर ताजणे

President Droupadi Murmu review gadar 2 sunny deol : बॉलीवूडमध्ये सध्या गदर २ ची मोठी चर्चा आहे. या चित्रपटानं सोशल मीडियावर हवा केली आहे. गेल्या दोन दशकांपासून प्रेक्षकांना वाट पाहायला लावली होती. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गदर २ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

गदर २ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. यासगळ्यात राष्ट्रपतींनी गदर पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. यापूर्वी देशातील वेगवेगळ्या मान्यवरांनी गदर २ ची प्रशंसा केली आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयानं पाहायला हवा. देशभक्ती, देशप्रेम या गोष्टी गदर मधून प्रभावीपणे दिग्दर्शकानं आपल्यासमोर मांडल्या आहेत. असे त्या मान्यवरांनी म्हटले आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

यासगळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले आहे. अनिल शर्मा यांनी आज तक ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राष्ट्रपतींच्या त्या प्रतिक्रियेविषयी सांगितले आहे. ते म्हणाले, आम्हाला सेंसॉर बोर्डाकडून फोन आलाहोता. त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती मुर्मू यांना गदर २ पाहण्याची इच्छा आहे. बोर्डानं आम्हाला मेल करुन ही गोष्ट सांगितली. याचा आनंद मोठा होता.

राष्ट्रपतींनी आमचा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त करणं हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. आम्हाला जेव्हा त्यासंदर्भात मेल आला तो क्षण महत्वाचा होता. राष्ट्रपतींनी गदर २ पाहण्याची इच्छा व्यक्त करणं ही मोठी गोष्ट आहे. आम्ही उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. त्यावेळी त्या फिल्म पाहणार आहेत. आमच्यासाठी ही गर्वाची बाब आहे. राष्ट्रपती निवासमध्ये हे स्क्रिनिंग पार पडणार आहे.

२००१ मध्ये गदरचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २२ वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गदर २ ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ४० कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. गदर २ च्या जोडीला अक्षय कुमारचा ओएमजी २ देखील प्रदर्शित झाला आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ मध्ये सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असे सांगण्यात आले आहे. त्याच्या अॅडव्हान्स बुकींगला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT