Gadar 2 New Song  esakal
मनोरंजन

Gadar 2 New Song : वय वर्षे 66! सनी देओल अजूनही म्हणतोय, उड जा काले कावा तेरे...

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गदर २ चित्रपटातील गाण्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Udd Jaa Kaale Kaava Song Release : बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटांचे नाव सर्वोत्तम चित्रपटांमध्ये घेतले जाते त्यात अनिल शर्मा दिग्दर्शित आणि सनी देओल, अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेल्या गदर चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता गदर २ चित्रपट येतो आहे. त्यामध्ये देखील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या भूमिका आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गदर २ चित्रपटातील गाण्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन मात्र नेटकऱ्यांनी सनी देओल आणि अमिषा पटेलची चांगलीच शाळा घेतली आहे. काहींनी तर त्यांची टिंगल टवाळी केली आहे. एकानं सनी देओलचं वय ६६ आणि अमिषा ४७ या कलाकारांचे चित्रपट आम्ही पाहायला थिएटरमध्ये जायचे का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. गदर २ विषयी गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु होती.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

अमिषानं गदर मध्ये सकीनाची भूमिका साकारली आहे तर सनी देओलनं तारा सिंगची. पाकिस्तानातील सकिनासोबत तारा सिंगनं लग्न केले आहे.त्यांना एक मुलगाही आहे. भारत आणि पाकिस्ताना यांच्यातील तणाव हा सगळ्यांना माहिती आहे. अशावेळी तारासिंग समोर वेगळेच प्रश्न आहे. सकीना आणि तारासिंगला दोन्ही देशांकडून होणारा त्रास त्यात पाकिस्तानकडून सतत केली जाणारी विचारणा यामुळे तारा सिंगनं मोठा निर्णय घेतला आहे.

२२ वर्षांनी गदरचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्या दुसऱ्या भागातील उड जा काले कावा तेरे....नावाचे गाणे व्हायरल झाले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावर तीन मिनिचं आणि अठरा सेकंदाचे ते गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

त्या गाण्याात तारा सिंग आणि सकीना यांच्यातील रोमान्स खूप काही सांगून जाणारा आहे. त्या गाण्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अमिषा आणि सनी देओलचा लूकच इतका वेगळा आहे की त्यावरुन अनेकांनी त्यांना वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत.

उड जा काले कावा तेरे...हे गाणं उदित नारायण यांनी गायलं आहे. त्या गाण्याचे नवीन व्हर्जन देखील चाहत्यांना आवडल्याचे दिसून येत आहे. एकानं त्या गाण्याचे कौतूक करताना लिहिलं आहे की, गदर हा चित्रपट ९० च्या दशकांतील प्रेक्षकांसाठी वेगळीच इमोशन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT