Gadar 2 Poor Direction And Acting Outdated : बॉलीवूडचा स्टार अभिनेता सनी देओलचा गदर २ आता प्रदर्शित झाला आहे. तब्बल २३ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे गदर मधील तारा सिंगकडून चाहत्यांना मोठा अपेक्षा होत्या. मात्र दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी निराशा केल्याचे चाहते आणि नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा गदर २ आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी २ यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. यात टॉलीवूडचा सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलरही प्रदर्शित झाला आहे. यात गदर २ ची प्रेक्षकांना सर्वाधिक उत्सुकता होती. मात्र सोशल मीडियावर गदर २ चित्रपटावर प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.
Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत
सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गदर २ चित्रपटाचा कालावधी हा १७० मिनिटांचा आहे. मात्र या कालावधीत प्रेक्षकांचे मनोरंजन कमी आणि गाण्यांचा भडिमार, रटाळ कथानक यामुळे प्रेक्षकांना मोठी डोकेदुखी सहन करावी लागली आहे. चित्रपटाचे रिव्ह्यू आता समोर आले असून त्यात त्यांनी तारा सिंगनं आम्हाला नाराज केल्याचे म्हटले आहे. गदर २ चे प्रमोशन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यांना वाघा बॉर्डर ते देशातील वेगवेगळ्या प्रसिद्ध स्थळांना भेटी देऊन चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
गदर २ चे दिग्दर्शन आणि त्यांची निराशाजनक कथा यावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. त्यामुळेच की काय या चित्रपटाला अनेकांनी पाचपैकी दोन किंवा तीन स्टार देण्यात समाधान मानले आहे. काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, पूर्वीचा गदर पाहण्यासारखा होता. नव्यामध्ये नवं असं काही पाहायला मिळत नाही. पूर्वीच्याच चित्रपटामधील गाणी आणि प्रसंग पुन्हा नव्या रुपात दिग्दर्शकानं प्रेक्षकांसमोर आणले आहेत.
काहींचे म्हणणे आहे की, हा चित्रपट पाहणे म्हणजे मोठे डोकेदुखी म्हणावी लागेल. दिग्दर्शकानं हा चित्रपट त्याच्या मुलासाठी तर नाही ना तयार केला अशी नेटकरी करु लागले आहेत. सनी देओलला चित्रपटात म्हणावी इतकी स्पेस काही मिळालेली नाही. बाकीचेच प्रसंग अधिक आहेत, त्याची काही गरज नव्हती. त्यामुळे हा चित्रपट कंटाळवाणा झाला आहे. अशा प्रतिक्रिया गदर २ चित्रपटाला मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.