Gadar 2 New Song Mein Nikla Gaddi Leke Sunny Deol  esakal
मनोरंजन

Gadar 2 New Song: 'मैं निकला गड्डी लेके....' 23 वर्षांनीही सनी काही ऐकेना, अमिषा नाही म्हणेना!

आता सनीच्या गदर २ मधील मैं निकला गड्डी लेके नावाचे गाणे व्हायरल झाले आहे.

युगंधर ताजणे

Gadar 2 New Song Mein Nikla Gaddi Leke Sunny Deol : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलच्या गदरचा ट्रेलर आता समोर आला आहे. तो प्रेक्षकांच्या कौतूकास पात्र ठरला आहे. तब्बल २३ वर्षांनी गदरचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओल, अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील मैं निकला गड्डी लेके प्रसिद्ध गाण्यानं चाहत्यांना भुरळ घातली आहे.

सनीनं वयाची साठी पार केली आहे. अमिषा चाळीशीच्या घरात आहे. गदरच्या पहिल्या भागात या दोन्ही कलाकारांनी कमाल केली होती. त्यातील त्यांच्या अभिनयानं गदरला बॉक्सऑफिसवर मोठं यश मिळवलं होतं. सनीनं तारासिंगची भूमिका साकारली होती. तो पाकिस्तानात जाऊन त्याची प्रियसी सकीनाला भारतात घेऊन येतो. मात्र या दरम्यान त्याला वेगवेगळ्या संकटांचा सामनाही करावा लागला होता.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आता सनीच्या गदर २ मधील मैं निकला गड्डी लेके नावाचे गाणे व्हायरल झाले आहे. जुन्या गदर मधील हे गाणे नव्या रुपात आणि ढंगात सादर करण्यात आले आहे. त्यात सनीचा आणि अमिषाचा लूक मात्र लक्षवेधी आहे. यामध्ये सनी ट्रकमध्ये नव्हे तर बुलेटवर सफारी करत असल्याचे दिसते आहे. अमिषा अजूनही तारासिंगची तितक्याच उत्कटतेनं वाट पाहते. असा तो प्रसंग चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडताना दिसत आहे.

त्या गाण्यामध्ये सनी, अमिषा आणि उत्कर्ष शर्मा हे दोघेही दिसत आहे. त्या गाण्याचा बाजही पहिल्या गाण्यापेक्षा वेगळा आहे. मैं निकला गड्डी लेकेच्या रिप्राईज्ड व्हर्जनला चाहत्यांनी स्विकारले आहे. त्याला जोरदार प्रतिसादही मिळाला आहे. ते चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन कळून येते. अवघ्या काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्या गाण्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. त्या गाण्यामध्ये सनी आणि अमिषा पटेल यांच्यात एक रोमँटिक सीन दाखवला आहे. तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

मैं निकला गड्डी लेके हे मुळ गाणे उदित नारायण यांनी गायले असून नवीन व्हर्जनमध्ये ते त्यांचा मुलगा आदित्य नारायणनं गायलं आहे. तर शबीना खाननं या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. सनी आणि उत्कर्ष शर्मावर आधारित या गाण्यामध्ये उत्कर्षसाठी आदित्यनं आवाज दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT