Pakistan Gadar 2 Reaction Esakal
मनोरंजन

Pakistan Gadar 2 Reaction: गदर २ बद्दल पाकिस्तानी काय म्हणतायत? भन्नाट रिव्ह्यू व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Pakistan Gadar 2 Reaction: बॉलीवूड सुपरस्टार सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 ने केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. 11ऑगस्ट रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटात भारत पाकिस्तानातील वाद, युद्ध आणि प्रेम कहानी दाखवण्यात आली आहे.

गदरच्या पहिल्या भागात भारत- पाक फाळणीनंतर तारा सिंग हा सकिनाला घ्यायला पाकिस्तानात गेला होता. गदर 2 मध्ये तो त्याच्या मुलाला घ्यायला गेला. आता तारा सिंग पाकिस्तानात गेल्यानंतर काही शांततेत परत थोडी येणार त्याने तिथे पुन्हा तोडफोड केली. आता भारतात तर गदर 2 पाहताना हिंदुस्थान झिंदाबाद चे नारे लागले मात्र पाकिस्तानात गदर 2 बद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत याची देखील चर्चा आहे.

आता सोशल मिडियावर एक पाकिस्तानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पाकिस्तानी लोकांनी गदर2 बद्दल त्यांची मतं सांगितली आहेत.

एका पाकिस्तानी यूट्यूबरने सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाबाबत पाकिस्तानी लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या. यावर पाकिस्तानी लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.

YouTuber एकाला विचारतो की, "जर चित्रपटात सनी देओल आपल्या पाकिस्तानी लोकांना मारत असेल तर आपण काय करावे?"

यावर एक व्यक्ती म्हणतो की, 'हे चित्रपटात दाखवलं जात आहे'. त्याला एकदा इकडे यायला सांगा मग आपण त्याला सांगू. इथले पाकिस्तानी लोक किती धाडसी आहे.

तर दुसऱ्याला जेव्हा YouTuber म्हणतो की, 'त्याच्या हात अडीच किलोचा हात आहे?' यावर तो म्हणतो की, 'तो खोटं बोलतो त्याने मेक-अप करून सिक्स पॅक बनवले आहेत, त्याला इकडचे लोक सोडणार नाही. असे अनेक फनी प्रतिक्रिया पाकिस्तानातल्या लोकांनी गदर2 बाबत दिले आहेत.

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' मध्ये सनी देओल शिवाय अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाधवा, गौरव चोप्रा, सिमरत कौर आणि लव सिन्हा असे अनेक कलाकार दिसणार आहेत. चित्रपट तुफान कमाई करत असून 7व्या दिवशी चित्रपटाने 228 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT