Gadar 2 Premier Sunny Deol Nana Patekar Bollywood celebrity  esakal
मनोरंजन

Gadar 2 : सनीचा 'गदर' पाहायला 'नाना' गेले, तारा सिंगची डेरिंग पाहून 'योगी आदित्यनाथही' भारावले!

२००१ मध्ये अनिल शर्मा दिग्दर्शित गदरचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सकाळ डिजिटल टीम

Gadar 2 Premier Sunny Deol Nana Patekar Bollywood celebrity : सनी देओलच्या गदरनं आता मोठ्या प्रमाणावर वातावऱण निर्मिती केली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलावंतांनी सनीच्या या चित्रपटावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. म्हणून की काय अक्षय कुमारच्या ओएमजी २ मध्ये देखील गदर चे एक गाणे अक्षयच्या तोंडून ऐकू येते. इतका गदरचा प्रभाव आहे.

२००१ मध्ये अनिल शर्मा दिग्दर्शित गदरचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात सनी देओल, अमिषा पटेल, अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी त्यांचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन दशकांहून अधिक काळ या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक वाट पाहत होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सनीनं देखील एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला माहिती आहे की, गदर २ ची प्रेक्षकांनी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली आहे. मुळात त्याचा दुसरा भाग हा तयार करायचाच नव्हता. हा चित्रपट म्हणजे लोकांच्या मनातील एक संवेदना आहे. ती भावना इतकी तीव्र आहे की पुन्हा त्या भावनेची मोडतोड होणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.

दरम्यान बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या की, आम्ही हा चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. असे सनीनं सांगितले. आता मुंबईतील एका थिएटरमध्ये गदर २ चा प्रीमिअर पार पडला असून त्याला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हजर होते. त्या प्रीमिअरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा आहे.

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि सनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी सनीची गळाभेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सनी तू कमाल केली आहेस, तुझे अभिनंदन असे म्हणून त्याचं कौतूकही केले आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील सनीच्या गदरसाठी उपस्थिती लावल्याचे दिसून आले आहे. त्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

याशिवाय बॉलीवूमधून अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी यावेळी हजेरी लावली होती. त्यात जॅकी श्रॉफ, धर्मेंद्र, सनीची आई प्रकाश कौर उपस्थित होत्या. बॉबी देओल हा त्याची पत्नी तान्या सोबत आला होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सनीच्या गदरनं आतापर्यत ८३ कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. तर ओएमजीनं पंचवीस कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT