Gadar 2 Sunny Deol esakal
मनोरंजन

Gadar 2 Sunny Deol: 'बॉलीवूड सडलेलं नाही तर सडलेली लोकं बॉलीवूडमध्ये!' सनीचा संताप

एक दोन नव्हे तर तब्बल २३ वर्षांनी सनी देओलचा गदर २ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युगंधर ताजणे

Gadar 2 Sunny Deol : बॉलीवूडमध्ये पुढील आठवडा सर्वाधिक उत्सुकतेचा राहणार आहे. याला कारण वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात सनी देओलचा गदर २ आणि अक्षय कुमारच्या ओएमजी २ चा समावेश आहे. यासगळ्यात प्रेक्षकांना कुतूहल आहे ते सनी पाजीच्या गदर २ ची.

एक दोन नव्हे तर तब्बल २३ वर्षांनी सनी देओलचा गदर २ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटातील प्रमुख कलाकार सनी देओल, अमिषा पटेल आणि दिग्दर्शक अनिल शर्मा हे प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सनीला गदर चा पहिला भाग प्रदर्शित करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी त्याला अनेक चित्रपट वितरकांनी नकार दिला होता. त्यामुळे सनीची डोकेदुखी वाढली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सनी हा हिंदू आणि मुस्लिम याविषयावर तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील काही गोष्टींवर चित्रपट घेऊन येतो आहे अशी चर्चा होती. सनीच्या चित्रपटाचा विषय हा भलताच संवेदनशील होता. त्यामुळे तो प्रदर्शित करण्यास काही थिएटर मालकांनी देखील नकार दिल्याचे सनीनं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. आताही सनीच्या एका प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सनीचा राग हा सर्वांना माहिती आहे. त्याच्या रागीट स्वभावामुळे त्यानं बॉलीवूडमधील अनेकांशी वाईटपणाही घेतला आहे. कुणाच्या वाटेला जायचं नाही आणि आपल्या वाटेला कुणी गेलं तर सोडायचं नाही या तत्वावर बॉलीवूडचा प्रवास करणाऱ्या सनीनं बॉलीवूडमध्ये कशाप्रकारचे वातावरण आहे याविषयी त्या मुलाखतीतून सांगितले आहे. ती मुलाखत ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

येत्या अकरा ऑगस्टला सनीचा गदर २ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सनीनं त्या मुलाखतीतून बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर रोखठोकपणे प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर बोलताना सनी म्हणतो की, तुम्ही बॉलीवूडला सडलेलं म्हणता कारण त्यात ड्रग्ज कनेक्शन आहे. पण मी सांगतो की, बॉलीवूड हे काही सडलेलं नाही तर त्यातील लोकं ही सडलेल्या मनोवृत्तीची आहेत.

हा प्रकार केवळ मनोरंजन विश्वात आहे असंही नाही. तर क्रीडाक्षेत्रात देखील या गोष्टी दिसून येतात. तुम्हाला जर त्या गोष्टींची सवय लागली असेल तर मग सगळं काही अवघड होऊन बसते. बाकीची लोकं तुम्हाला कायम बोलण्यास तयार असतात. हे लक्षात घेण्याची गरज आहे. असेही सनीनं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या सुरू असलेल्या खटल्यात न्याय कधी मिळणार? उद्धव ठाकरेंनी थेट 'ती' वेळच सांगितली! म्हणाले...

India Squad for Australia : रोहित शर्मा, विराट कोहलीच्या ODI भविष्याबाबत संकेत मिळाले, पण दोन खेळाडूंचं करियर संपल्यातच जमा झाले! संघात त्यांचे नावच नाही

Nilesh Ghaiwal: 'घ'च्या ऐवजी 'ग', घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी कसा घातला घोळ? सापडला मोठा पुरावा, १0 दिवसांपूर्वी उघडले बँक खाते

Latest Marathi News Live Update : जयंत पाटलांवरील टीकेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; वादावर पडदा

Lasalgaon News : बसस्थानकात विद्यार्थिनींचा आक्रोश! 'आम्ही सुरक्षित आहोत का?'; लासलगाव बस डेपोच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT