Gadar 2 Sunny Deol Interview reaction esakal
मनोरंजन

Gadar 2 Movie : 'बॉलीवूडमधील एक अभिनेता दाखवा जो.... !' सनीनं टाकला मोठा बॉम्ब

सनीची एक मुलाखत व्हायरल होत आहे. त्यानं वडील धर्मेंद्र यांच्याविषयी मोठी गोष्ट सांगितली आहे.

युगंधर ताजणे

Gadar 2 Sunny Deol Interview reaction : प्रसिद्ध अभिनेता सनीचा गदर २ सध्या जिकडे तिकडे चर्चेचा विषय आहे. सनीनं आपल्या या चित्रपटाचे प्रमोशन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केले आहे. कधी तो अटारी बॉर्डरवर दिसला तर कधी थिटएरमध्ये जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधत होता.

यासगळ्यात सनीची एक मुलाखत व्हायरल होत आहे. त्यानं वडील धर्मेंद्र यांच्याविषयी मोठी गोष्ट सांगितली आहे. सध्याचे अभिनेते आणि पूर्वीचे अभिनेते यांच्यात काय फरक आहे याविषयी सनीनं बिनधास्तपणे वक्तव्य केले आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. एरवी सनी हा कधीही फारशा मुलाखती देताना दिसत नाही. मात्र आता तो फारच अॅक्टिव्ह झाला आहे.

Also Read : दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

धर्मेंद्र त्या मुलाखतीमध्ये म्हणतो की, आमच्या सगळ्या कुटूंबाला देश ओळखतं. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आमच्या कुटूंबियांची भूमिका महत्वाची राहिली आहे. मला काही गोष्टीबाबत स्पष्टपणे सांगायचे आहे. माझ्या वडिलांचे बॉलीवूडसाठी मोठे योगदान आहे. त्यांनी जे चित्रपट केले ते इतर कुणीच केलेले नाहीत. धर्मेंद्र हे एकमेव असे अभिनेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपटांमध्ये काम केले.

धर्मेंद्र यांनी ड्रामा, क्राईम, अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, अशा वेगवेगळ्या प्रकारांतील चित्रपटांमध्ये काम केले. आणि त्यांच्या त्या भूमिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ते चित्रपट सुपरहिट झाले आहेत. आताचा कोणता असा अभिनेता आहे जो सांगेल की, त्यानं कॉमेडी केली, अॅक्शन मुव्हींमध्ये काम केले, असं कुणी सांगणार नाही. धर्मेंद्र यांनी ज्या चित्रपटांमध्ये काम केले ते हिट झाले.

आताच्या काळात त्यांच्यासारखा एकही अभिनेता नाही आणि पूर्वीच्या काळातही नव्हता. माझे पप्पा हे एकमेव आहेत. त्यांनी स्वताविषयी अनेक गोष्टी या कधीही सांगितल्या नाहीत. प्रेक्षक त्यांना पाहत आले आहेत. त्यांना सगळं काही माहिती आहे. इंडस्ट्रीनं कधीही त्यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली नाही याचे कारण ते खूप मोठे अभिनेते आहेत. त्यांच्यासारखे कुणीही नाही. असे सनीनं म्हटले आहे.

सनीचा गदर २ हा सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तब्बल २२ वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सनीनं त्या मुलाखतीमध्ये गदर विषयी बोलताना सांगितले की, असा चित्रपट होणं ही प्रेक्षकांची इच्छा होती. जनतेला असा चित्रपट हवा होता. आणि त्यांना तो आवडला. असेही सनीनं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT