Gadar 2 Twitter Review  Esakal
मनोरंजन

Gadar 2 Twitter Review: सनी हे काय केलसं रे भावा ! गदर 2 पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणताय..

ट्विटरवर गदर 2 ट्रेंड करत आहे. अनेकांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू शेयर केला आहे. आता या रिव्ह्यूवरुन प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला आणि तो अपेक्षा पुर्ण करणार का हे पाहूया.

Vaishali Patil

Gadar 2 Twitter Review: बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा गदर हा सिनेमा तब्बल 23 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही केले आहे.

गदर 2 मधुन पुन्हा तारा सिंह आणि सकिना ची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या सिनेमाने आज अखेर चित्रपटगृहात एंट्री मारली आहे. अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला.

त्यानंतर ट्विटरवर गदर 2 ट्रेंड करत आहे. अनेकांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू शेयर केला आहे. आता या रिव्ह्यूवरुन प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला आणि तो अपेक्षा पुर्ण करणार का हे पाहूया.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाबाबत ट्विट केले आहे. त्यांनी या चित्रपटाला 5 पैकी फक्त दीडच स्टार दिले आहेत.

त्यांना हा चित्रपट मुळीच आवडला नाही. त्यांना हा चित्रपट सहन करणे कठीण झाले आहे. त्यांनी चित्रपटाला निरुपयोगी म्हटलं आहे. चित्रपटाचा सेकंड हाफ पूर्णपणे निरुपयोगी असून या चित्रपटाने लोकांची निराशा केली आहे, असं ते म्हणतात.

अशा अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही लोकांनी या चित्रपटाला छान कॉमेडी चित्रपट म्हटलं तर काहींना हा सिनेमा केवळ डोकेदुखी वाटला आहे.

एकानं लिहिलयं, 'आताच गदर 2 पाहिला... हा सर्कस चित्रपट आहे. त्यात 'मैं निकला गड्डी लेके' गाण्याशिवाय दुसरं काही नाही. यापेक्षा भोजपुरी चित्रपट चांगला.'

तर एकानं लिहिलयं की, "गदर 2 सर्व रेकॉर्ड मोडत आहे. अनिल शर्माने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सनी देओल त्याच्या सर्वोत्तम चित्रपटात आहे."

तर दुसऱ्याने लिहिलयं की, #Gadar2 ने माझ्या सर्व अपेक्षा पुर्ण केल्या!SunnyDeol ने ज्या पद्धतीने चित्रपट बनवलाय अविश्वसनीय आहे. एक सिनेमॅटिक उत्कृष्ट नमुना!

'गदर 2'ला ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी 'गदर 2' पूर्णपणे जुना झाल्याचे म्हटले आहे, तर काहींनी 'गदर 2'मध्ये सनी देओलचे मोजकेच सीन असल्याने निराशा व्यक्त केली आहे.

'#गदरमधला हा सीन वेगळाच हिट होता मात्र Gadar2 इतका प्रभावी नाही.'

'90 च्या दशकातील फील, अॅक्शन, इमोशन, परफॉर्मन्स या सर्व मर्यादेच्या बाहेर असलेला खूप बॅकडेटेड चित्रपट.. हा चित्रपट एक विनोद आहे. UtkarshSharma चं लाँचिंग पुन्हा एकदा अयशस्वी झालयं. सनी देओलचे सीन्स खूपच कमी आहेत, व्हिज्युअल भयानक आहेत. संवाद चांगले आहेत' . अशा समिश्र प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT