Gadar 2 Vs OMG 2 Box Office Collection Day 2: esakal
मनोरंजन

Gadar 2 Vs OMG 2 Box Office Collection Day 2: सनीला तोड नाय! 'गदर'च्या कमाईसमोर OMG2 नं सोडला जीव

Vaishali Patil

Gadar 2 Vs OMG 2 Box Office Collection Day 2: सध्या मनोरंजन विश्वात 'गदर 2' आणि 'OMG 2' या दोन्ही चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हे दोन्ही सुपरस्टारर चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलिज झाले आणि दोन्हींमध्ये स्पर्धा लागली.

त्यात पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये गदर 2 ने बाजी मारली होती तर आता दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे देखील समोर आले आहेत . आता दुसऱ्या दिवशी 'गदर 2' आणि 'OMG 2' ने किती कोटींचे कलेक्शन केले यावर नजर टाकूया.

'गदर 2' ची दुसऱ्या दिवशीची कमाई

पहिल्या दिवशी गदरने2 ने जवळपास 40 कोटींची कमाई करत या वर्षातील दुसरा मोठा ओपनर ठरला.

तर आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 45 कोटींची कमाई केली आहे. त्यातच आता 15 ऑगस्ट आणि लाँग विकेंडचा फायदा या चित्रपटाला नक्कीच मिळेल आणि चित्रपट 175 कोटींचा टप्पा ओलांडू शकेल असा विश्वास चाहते आणि निर्मात्यांना आहे.

गदरच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर त्यात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा सिमरत कौर आणि मनीष वाधवा हे कलाकार आहेत.

OMG 2 ची दुसऱ्या दिवशीची कमाई

OMG 2 चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 10 कोटींची कमाई केली. आता त्यानंतर आता या चित्रपटाची दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 15 कोटींचा व्यवसाय केला आहे.

अशातच आता या चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली दिसली. अअशा परिस्थितीत हा सिनेमा देखील 50 कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी या चित्रपटातील अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहे.

बॉलिवूडमध्ये OMG 2 आणि गदर 2 दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच आणखी एक चित्रपट आपल्या दमदार कमाई करत आहे. तो म्हणजे दुसरं कोणी नसून रजनीकांतची 'जेलर' आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 75 कोटींचा आकडा पार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : कॉर्पोरेटमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बनला रिक्षा ड्रायव्हर; म्हणाला- पैसा गरजेचा पण... तरुणाचा व्हिडिओ तूफान व्हायरल

'Virat Kohli ला काही सिद्ध करण्याची गरज नाही...' कार्तिकने मनातलं सर्व बोलून दाखवलं; २०२७ वर्ल्ड कपबद्दल काय म्हणाला? पाहा Video

काय सांगता! 'या' मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर? साऊथही गाजवलंय, लपूनछपून सुरू आहे सारं

Dry Day: तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरात ३ दिवस ड्राय डे; कोणकोणत्या शहरात मद्यविक्री बंद? जाणून घ्या यादी...

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाबाबतचा निर्णय सोनिया गांधी घेणार; दिल्लीत घडामोडींना वेग, DK शिवकुमारांच्या गळ्यात CM पदाची माळ?

SCROLL FOR NEXT