Galwan Ghati Esakal
मनोरंजन

Galwan Ghati: भारतीय लष्कराच्या शौर्याची कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर! गलवानच्या घटनेवर चित्रपटाची घोषणा..

भारत आणि चीन यांच्यातील विवादित सीमा 'गलवान व्हॅली' संघर्ष आता मोठ्या पडद्यावर दाखविण्याची तयारी केली जात आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया 2020 मध्ये झालेल्या गलवन हिंसाचारावर चित्रपट बनवणार आहेत.

Vaishali Patil

भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाख सीमा ही नेहमीच वादाचा विषय राहिली आहे. या सीमेवर नेहमीच तणावपूर्ण परिस्थिती असते. गेल्या काही दशकांहून अधिक काळ भारत आणि चीनमध्ये येथील सीमेवरून वाद सुरू आहे.

2020 मध्ये भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये गलवान खोऱ्याबाबत वाद झाला होता, या संघर्षात भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये चकमक झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

जून 2020 रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली होती. या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चकमकीत चीनचे 38 पेक्षा जास्त सैनिक मारले गेल्याच्या बातम्या आल्या होत्या.

ही घटना बराच काळ गाजली. आजही या घटनेचा निषेध केला जातो. आता याच घटनेवर दिग्दर्शक अपूर्व लखिया या घटनेवर चित्रपट बनवणार आहेत. ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.

'एक अजनबी', 'शूटआउट अॅट लोखंडवाला' यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांच्या दिग्दर्शनासाठी अपूर्व लखिया ओळखला जातो.

या चित्रपटाच्या घोषणेबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. जी पाहिल्यानंतर भारतीय लष्कराच्या शौर्याची कहाणी पडद्यावर दाखवण्यासाठी अपूर्व पूर्णपणे सज्ज दिसत आहे.

या चित्रपटाची कथा गलवान व्हॅलीमध्ये चीन आणि भारतीय लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीवर लिहिलेल्या 'इंडियाज मोस्ट फिअरलेस 3' या पुस्तकातून घेण्यात येणार आहे. या पुस्तकात 2020 मध्ये गलवन भागात झालेल्या हिंसाचाराबद्दल लिहिले आहे.

पत्रकार शिव आरूर आणि राहुल सिंग यांनी हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय लष्कर आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षावर हे पुस्तक लिहिले आहे.

सुरेश नायर आणि चिंतन गांधी हे संयुक्तपणे चित्रपटाची या कथा लिहिणार आहेत. याशिवाय चित्रपटाचे संवाद चिंतन शाह लिहिणार आहेत. तर चित्रपटाच्या स्टार कास्टबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

काही दिवसांपुर्वी अभिनेता अजय देवगणनेही गलवान व्हॅली संघर्षावर चित्रपट बनवण्याबाबत बोलला होता. असे युद्धाच्या घटनेवर चित्रपट तयार करण्याची ही पहिलिच वेळ नसून याआधीही भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर अनेक चित्रपट बनले आहे. त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या कथाही आपण मोठ्या पडद्यावर पाहिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

SCROLL FOR NEXT