Gandhi Jayanti 2023 Kiran Mane Marathi Actor post viral  esakal
मनोरंजन

Gandhi Jayanti 2023 : 'दिसायला माणूस हडकुळा होता, छातीचा पिंजरा झाला होता, पण....'! किरण मानेंची गांधींवर खास पोस्ट

देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती देशभरातमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

युगंधर ताजणे

Gandhi Jayanti 2023 Kiran Mane Marathi Actor post viral : देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती देशभरातमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्तानं वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवली जात आहे त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते कलाक्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

यासगळ्यात मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि सोशल मीडियावर पोस्ट चर्चेचा विषय आहे. त्यात प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी फेसबूकवर गांधीजींविषयी व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. त्यांनी गांधीजींच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांना भावलेल्या गोष्टींविषयी सांगितले असून त्यावर नेटकऱ्यांना दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे. तुम्ही गांधीजींना कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही असे माने यांनी म्हटले आहे.

आपल्या पोस्टमध्ये माने म्हणतात की, ...मानूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता, पन माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजबी अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं ! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया... पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा...कुट्ट्टंबी... आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली, त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली मानसं भेटतील !

आपन कित्तीबी वरडुन बोललो - घसा फाडूफाडून बोललो, तरी आपल्या बोलन्यात 'सत्याचा अंश' नसंल तर जगाच्या बाजारात त्या बोलन्याला घंटा किंमत मिळत नसती... त्या महात्म्याचा आवाज खनखनीत नव्हता का चालन्यात रूबाब न्हवता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर त्यो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आन बसक्या आवाजात बोलत र्‍हायचा...

आवाजात चढउतार नायत का टाळीबाज-चटपटीत वाक्य नायत... पन त्याच्या विचारात 'निर्मळ'पना व्हता - शब्दाशब्दात भारतमातेवरची माया व्हती - रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस व्हती - मानवतेची कास व्हती - 'सत्याची' ताकद व्हती.. गोळ्या घालुन मारला बाबाला... पन तरीबी जित्ता र्‍हायला.. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एकबी देश असा नाय जिथं त्याचा विचार पोचला नाय.

खायचं काम नाय गड्याहो... ह्यांच्या हज्जार पिढ्या खपत्याल त्यो 'विचार' संपवायला पन 'गांधी' उसळी मारून वर येतच र्‍हानार. सलाम महात्म्या सलाम... कडकडीत सलाम.. माने यांच्या त्या पोस्टनं त्यांच्या चाहत्यांचे आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. यापूर्वी देखील माने यांनी केलेल्या पोस्टवरुन वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT