Gehana Vasisht Marriage  Esakal
मनोरंजन

Gehana Vasisht Marriage: 'फैजान नव्हे तर राम!', निकाहचा फोटो व्हायरल झाल्यानंतर गंदी बात फेम अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Gehana Vasisht Marriage: 'गंधी बात' फेम अभिनेत्री गेहाना वसिष्ठ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती प्रसिद्धीझोतात येण्याचे कारण त्याचा प्रोजेक्ट नव्हे तर तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. गेहना वशिष्ठचे लग्न फैजान अन्सारीसोबत लग्न केलं असल्याची बातम्या सोशल मिडियावर पसरल्या होत्या. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

गेहना वशिष्ठ आणि फैजान अन्सारीसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी लग्न केल्याचं मिडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. तिने धर्मांतरही केल्याच बोललं जात होत. त्यामुळे लोक प्रतिक्रिया देत होते. मात्र या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता.

त्यातच आता गेहनाने लग्नाची बातमी खोटी असल्याचं सांगितलं. तो फोटो शुटिंग दरम्यानचा होत असं तिने सांगतिलं. तिने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत शेयर केली.

गेहनाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात ती म्हणते की, 'मी कधीच लग्न केले नाही, ते फक्त वेब सीरिजचे शूटिंग होते बाकी काही नाही. या पोस्टसोबतच तिने लांबलचक नोट लिहिली आहे.'

त्यात ती म्हणते की, 'मी गेहना वशिष्ठ, मला हे स्पष्ट करायचं आहे की मी कधीही कोणाशीही लग्न केलेले नाही. हे फक्त वेब सिरीजचे शूट होते. त्याशिवाय काही नाही. मी फैजानला फारसं ओळखत नाही.

फैजानसोबतची ही माझी दुसरी भेट होती शूटिंगसाठी आणि तिसरी भेट आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये झाली. मला त्याचे पूर्ण नावही माहित नाही. तो कुठे आहे आणि त्याच्याबद्दल जास्त काही माहित नाही.

याशिवाय गेहानाने तिच्या बॉयफ्रेंडबद्दलही या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ती लिहिते की, 'माझा अनेक वर्षांपासूनचा बॉयफ्रेंड आहे आणि त्याचं नाव राम आहे. त्यामुळे दुसऱ्याशी लग्न करण्याचा प्रश्नच नाही.

आता गेहनाची ही पोस्ट सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. नेटकरी तिच्या या पोस्टवर कमेंट करत आहे. काही तर याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत.

गेहनाही नेहमीच चर्चेत असते. मुंबई पोलिसांनी काही काळापूर्वी अटक केली होती. रिपोर्टनुसार, गेहानाने राज कुंद्राच्या अॅपसाठी बनवलेल्या तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यावर बराच वाद देखील झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT