Oo Antava  
मनोरंजन

Video 'ऊ अंटावा' गाण्याची पडद्यामागील धमाल; पहा गणेश आचार्यचा डान्स

गणेश आचार्यने दाखवली स्टेप, अल्लू अर्जुन-समंथा झाले अवाक्!

स्वाती वेमूल

अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटातील 'ऊ अंटावा' (Oo Antava) या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) करिअरमधील हा पहिलाच आयटम साँग आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. नुकताच त्यांनी या गाण्याच्या पडद्यामागील धमालचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये गणेश आचार्य (Ganesh Acharya) हे अल्लू अर्जुन आणि समंथाला स्टेप्स शिकवताना दिसत आहेत. आपल्या एका असिस्टंटसोबत ते गाण्यामधील हुक स्टेप यामध्ये करताना दिसत आहेत.

गणेश आचार्य यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला ९५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर अनेक कलाकारांनी त्यावर कमेंट्स करत कौतुक केलं आहे. या गाण्यात समंथाचा बोल्ड लूक, तिचे हावभाव, नृत्यकौशल्य पाहून चाहते अवाक् झाले आहेत. समंथाने आतापर्यंत तिच्या करिअरमध्ये एकही आयटम साँग केलं नव्हतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 'डॅडी मम्मी', 'रिंग रिंगा', 'सुपर माची' यांसारखी काही सुपरहिट गाणी त्यांनी इंडस्ट्रीला दिली आहेत.

या गाण्यासाठी समंथाने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. गायिका कनिका कपूरने हिंदी व्हर्जनमधील गाणं गायलं आहे. रकीब अलमने हिंदी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT