Ganesh Festival Video
Ganesh Festival Video esakal
मनोरंजन

Ganesh Festival Video: सलमानची अर्पिताच्या घरी गणेश आरती! रितेशही सहभागी

युगंधर ताजणे

Ganesh Chaturthi: गणेशोत्सवाच्या निमित्तानं सगळीकडे धामधुमीचे वातावरण आहे. यासगळ्यात बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, संजय दत्त, सलमान खान, सोनाली बेंद्रे यांचे (Ganesh festival 2022) नाव सांगता येईल. यासगळ्यात बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या बहिणीच्या घरी सुरु असलेल्या श्रींच्या आरतीनं अनेकांचे लक्ष (social media news) वेधून घेतले आहे. त्या आरतीमध्ये सलमान खान सहभागी झाला होता. अर्पिताच्या घरी सुरु असलेल्या गणेशोत्सवामध्ये सलमानची उपस्थिती त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट होती. या आरतीमध्ये सलमानसोबत रितेशही सहभागी झाला होता.

व्हाईट कलरचा शर्ट आणि डेनिम लूकमध्ये सलमाननं लक्ष वेधून घेतले आहे. तो व्हिडिओ शेयर करताना सलमाननं लिहिलं आहे की, गणपती बाप्पा मोरया, सलमानच्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर दिलेल्या प्रतिक्रियाही चर्चेचा विषय आहे. सलमानच्या घरी दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्याच्या घरी होणारा साजरा होणारा गणेशोत्सव हा नेहमीच चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो.

काही वर्षांपूर्वी सलमाननं पुण्यातील निवडक ढोलपथकांना त्या उत्सवामध्ये सहभागी करुन घेतले होते. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमानची झलक लक्ष वेधून घेणारी होती. आताच्या व्हिडिओमध्ये त्यानं श्रींची केलेली आरती नेटकऱ्यांची पसंती मिळवताना दिसत आहे. सलमान बाप्पाच्या आरतीमध्ये तल्लीन झाला आहे. चाहत्यांनी त्याला गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यानं चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करुन सर्वांचे धन्यवाद मानले आहेत.

सलमानच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास तो किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला त्यानं कभी ईद कभी दिवाली असे नाव दिले होते. त्याच्या टायगर 3 चे प्रेक्षकांना वेध लागले आहे. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि साता समुद्रापार देखील हा उत्सव तितक्याच भक्तीनं साजरा केला जातो. दहा दिवसांपर्यत सुरु असणाऱ्या या उत्सवामध्ये लाखो भक्तगण सहभागी होतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवावर बंधनं होती. यंदाचा उत्सव हा सर्वांसाठी स्पेशल असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT