Ganeshotsav 2022 director ravi jadhav shared video he made eco friendly ganpati idol
Ganeshotsav 2022 director ravi jadhav shared video he made eco friendly ganpati idol sakal
मनोरंजन

Ganeshotsav 2022: रवी जाधवने घडवला इको फ्रेंडली बाप्पा.. पाहा खास विडिओ..

नीलेश अडसूळ

ravi jadhav : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. थोड्याच दिवसात बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार असल्याने जो तो मूर्ती, सजावट, मखर अशा पूर्व . तयारीच्या गडबडीत आहे. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. गणेशोत्सवात कलाकारांच्या घरच्या बाप्पाकडे सर्वांचेच लक्ष्य लागलेले असते. त्यामुळे तो कसा वेगळा होईल यासाठी कलाकार प्रयत्न करत असतात. नटरंग, न्यूड, टाइमपास, बीपी अशा अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधवही गणेशोत्सवाची जोरदार तयारी करत आहे. त्यांचा घरचा बाप्पा त्यांनी स्वतःच घडवला आहे. एक व्हिडिओ शेयर करत त्यांनी घरच्या गणपतीची लगबग दाखवली आहे. (Ganeshotsav 2022 director ravi jadhav shared video he made eco friendly ganpati idol)

रवी जाधव यांच्याकडे दरवर्षी जोरदार गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही त्यांच्याकडे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या जय्यत तयारी सुरु आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते गणपती घडवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ते दरवर्षी स्वतःच्या घरचा बाप्पा स्वतः घडवतात.

या व्हिडीओला त्यांनी एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे. 'आपला बाप्पा आपणच घडविण्याइतका दुसरा आनंद नाही!!! गणेशोत्सवाचे मंतरलेले १० दिवस आता जवळ आले आहेत. संपुर्ण महाराष्ट्राप्रमाणे आमचीही तयारी जोरात सुरु आहे. अजून रंगकाम बाकी आहे. ते झाल्यावर नक्कीच शेअर करीन!!! गणपती बाप्पा मोरया,' असे ते म्हणतात. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT