अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने 'UA' प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटातले दोन दृश्ये हटवण्याचा आदेश देखील दिला आहे. चित्रपटात केलेल्या एकूण बदलांपैकी, फक्त एक किंवा दोन मिनिट कमी करण्यात आले आहेत, ज्यात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत.
आलिया भट्ट अभिनीत संजय लीला भन्साळींचा गंगूबाई काठियावाडी पुढील वर्षी ७२ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Berlin International film festival) वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. निर्माते म्हणाले की, चित्रपट या एवढ्या मोठ्या महोत्सवात प्रदर्शित करण्याचा मला अभिमान वाटत आहे. (Gangubai Kathiawadi Controversy News)
महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले की भन्साळींचा चित्रपट हा एकमेव भारतीय चित्रपट आहे जो बर्लिनले स्पेशल गालासाठी निश्चित केलेल्या चार चित्रपटांपैकी एक आहे.
'गंगुबाई काठियावाडी' हे एक गुन्हेगारी-नाटक आहे, जे प्रख्यात लेखक हुसेन झैदी यांच्या "मुंबईच्या माफिया क्वीन्स" या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे. 1960 च्या दशकात कामाठीपुरामधील सर्वात शक्तिशाली, प्रिय आणि आदरणीय मॅडमपैकी एक असलेल्या गंगूबाईच्या शीर्षक भूमिकेत आलिया भट्ट दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.