'Gangubai Kathiawadi' dance In front of eiffel tower(Paris)
'Gangubai Kathiawadi' dance In front of eiffel tower(Paris) Instagram
मनोरंजन

पॅरिसच्या रस्त्यावर चक्क आयफेल टॉवरसमोर महिलांनी केला 'गंगूबाई डान्स'

प्रणाली मोरे

संजय लीला भन्साळी(Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी'(Gangubai kathiawadi) सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत होता. सिनेमाचं कथानक ही जमेची बाजू असली तरी त्यातील आलिया भट्टचा(Alia Bhatt) अभिनय आणि तिचा लूक यानं बाजी मारलेली अधिक दिसून आली. या सिनेमाला वादानं घेरलं होतं तरी बॉक्सऑफिस कलेक्शनवर नुकसान नाही झालं. सिनेमा १०० करोड क्लबमध्ये जाऊन बसलाच. सिनेमातील गाणीही तितकीच श्रवणीय होती आणि त्यावर आलियानं केलेला 'ढोलिडा' गाण्यावरचा डान्स तर भन्नाटच होता. सोशल मीडियावर आलियाच्या सिनेमातील संवादाच्या अनेक व्हिडीओ रील्सचा चाहत्यांनी नुसता पाऊस पाडला होता.

आलियाचा पांढऱ्या साडीतील लूकही अनेकींनी जसाच्या तसा वठवून गंगूबाईसारखं दिसण्याची आपली हौस भागवून घेतली. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत १३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पण आता पुन्हा 'गंगूबाई काठियावाडी' एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतोय,मानसी पारेख ही महिला आपल्या दोन मैत्रिणींसह आयफेल टॉवरसमोर साडी आणि पायात चक्क शूज घालून नाचत आहे. या तिघी जणींनी 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'ढोलिडा' गाण्याच्या हुक अप स्टेपवर ताल धरलाय. या व्हिडीओला कॅप्शन दिलंय,''आ गई गंगूबाई''.या व्हिडीओला अपलोड केल्यानंतर १३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT