Ganpath Movie Tiger Shroff bollywood Actor Shree Ganesha  esakal
मनोरंजन

Ganpath Song Viral : टायगर मध्ये एवढी उर्जा येते कुठून, 'गणपथ' मधील 'जय गणेशा' पाहून अंगावर येईल काटा!

काही दिवसांपूर्वी गणपथचा टीझर व्हायरल झाला होता. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांचा हटके लूक आणि टायगरची जबरदस्त अॅक्शन पाहून चाहते भारावून गेले होते.

युगंधर ताजणे

Ganpath Movie Tiger Shroff bollywood Actor Shree Ganesha : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या हटके स्टाईल आणि धाडसी अॅक्शन सीन्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. आजवर बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेतील अॅक्शन हिरोंमध्ये त्याचे नाव घेतले जाते. सध्या त्याचा गणपथ नावाचा चित्रपट चर्चेत आला असून त्या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

काही दिवसांपूर्वी गणपथचा टीझर व्हायरल झाला होता. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांचा हटके लूक आणि टायगरची जबरदस्त अॅक्शन पाहून चाहते भारावून गेले होते. आता त्याच चित्रपटातील जय गणेशा गाण्यानं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. टीझरला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रोमांचक ट्रेलरने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना वेगळ्याच उंचीवर नेले आहे. चित्रपटातील 'जय गणेश' हे भव्य उत्सवी गाणे सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी पहिले गाणे 'हम आये हैं' लाँच केले होते जे रिलीज झाल्यापासून सर्व प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय आहे. चित्रपटाचा संगीतमय प्रवास सुरू ठेवत निर्मात्यांनी बहुप्रतिक्षित 'जय गणेश' गाणे रिलीज केले आहे. जय गणेश हे गाणे विशाल मिश्रा यांनी गायले असून संगीतकार अक्षय त्रिपाठी यांनी गीतं लिहिली आहेत.

पूजा एंटरटेनमेंट गुड कंपनीच्या सहकार्याने प्रस्तुत 'गणपत: अ हिरो इज बॉर्न' ज्याचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत जगभरात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुणे शहरात येणाऱ्या मार्गांवर दुतर्फा कोंडी; सध्यांकाळी रांगा वाढल्या

Rohini Kalam: धक्कादायक! फोनवर बोलली, नंतर खोलीत गेली अन्...; भारतीय महिला खेळाडूनं संपवलं जीवन

Delhi Acid Attack : राजधानी दिल्लीत संतापजनक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात ‘अ‍ॅसिड’ हल्ला

Uttar Pradesh News : सीएम योगींची दिल्लीत पीएम मोदींशी भेट, सुमारे एक तास चर्चा; मंत्रिमंडळ विस्तारावर मंथन?

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

SCROLL FOR NEXT