ganpati visarjan 2023 kasba ganpati visarjan miravnuk kalawant dhol pathak vadan siddharth jadhav
ganpati visarjan 2023 kasba ganpati visarjan miravnuk kalawant dhol pathak vadan siddharth jadhav  SAKAL
मनोरंजन

Ganesh Visarjan 2023: "कलाकारांची एनर्जी गणरायाच्या चरणी..", सिद्धार्थ जाधवचं कसबा विसर्जन मिरवणुकीत कलावंत ढोलपथकासाठी वादन

Devendra Jadhav

Ganesh Visarjan 2023: सध्या सगळीकडे गणपती उत्सवाची धामधूम जल्लोषात सुरु आहे. गणपती बाप्पाला निरोप द्यायला संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त पुढे आले आहेत. लालबाग, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाला प्रचंड गर्दी झालेली दिसतेय.

अशातच पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंत ढोलपथकाने वादन केलंय. यानिमित्ताने सकाळ व्हिडीओ टीमने कलावंत ढोलपथकातील अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत खास बातचीत केलीय.

(ganpati visarjan 2023 kasba ganpati visarjan miravnuk kalawant dhol pathak vadan siddharth jadhav)

कलावंत ढोलपथकात वादन करुन डबल एनर्जी मिळते: सिद्धार्थ जाधव

सकाळ व्हिडीओ टीमने कलावंत ढोलपथकात वादन करणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ जाधव सोबत खास बातचीत केलीय. सिद्धार्थ जाधव म्हणतो, "कलावंत ढोलपथकात गेल्या १० वर्ष वादन करतोय. खुप मस्त वाटतंय. इथे आल्यावर वेगळीच एनर्जी जाणवते. याशिवाय वादन करुन आम्हाला डबल एनर्जी मिळते. गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होतोय. गणपती बाप्पा मोरया." अशा शब्दात सिद्धार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

आज २८ सप्टेंबरला अनंत चतुदर्शीला देशभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतोय. यानिमित्ताने ठिकठिकाणी मोठमोठ्या मिरवणुका, ढोल ताशांचे पथक बघायला मिळाले.

महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकींचा वेगळाच थाट अनुभवायला मिळाला. यंदा कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत कलावंत ढोलपथकाचं वादन बघायला मिळतंय.

यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री श्रृती मराठे, तेजस्विनी पंडीत, अनुजा साठे, आस्ताद काळे, शाश्वती पिंपळीकर, दिप्ती देवी असे कलाकार सहभागी होते.

कलावंत ढोलपथकाबद्दल थोडंसं...

मराठी कलाकारांनी 2014 साली एकत्र येऊन कलावंत ढोल ताशा पथक सुरु केले. राधा ही बावरी फेम अभिनेता सौरभ गोखलेने पुढाकार घेऊन या कलावंत पथकाची सुरुवात केली असं सांगण्यात येतं.

यंदा कलावंत पथकाचे हे दहावे वर्ष आहे. पुण्यात कलावंत पथकाच्या माध्यमातून मराठी कलाकार ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT