gashmeer mahajani after his father ravindra mahajani death marathi film industry actor support him after  SAKAL
मनोरंजन

Gashmeer Mahajani: वडीलांच्या मृत्यूनंतर मराठी कलाकरांनी सपोर्ट केला का? गश्मीर म्हणतोय, 'फक्त समजूतदार लोकच..'

वडीलांच्या निधनानंतर या तीन मराठी कलाकारांनी गश्मीरला वाईट काळात दिली साथ

Devendra Jadhav

Gashmeer Mahajani on Ravindra Mahajani News: गश्मिर महाजनी हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. गश्मीरच्या कुटुंबावर काही दिवसांपुर्वी दुःखाचा डोंगर कोसळला. गश्मीरचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनींचं निधन झालं.

रविंद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरला नेटकऱ्यांच्या टिकेला सामोरं जावं लागलं. गश्मीरचं वडीलांकडे दुर्लक्ष झालं, अशा पद्धतीची टिका गश्मीरला सहन करावी लागली. पण आता गश्मीरने काही अंशी का होईना या प्रकरणावर मौन सोडलंय.

(gashmeer mahajani on marathi film industry actor support him after)

वडीलांच्या निधनानंतर या कलाकारांनी केला गश्मीरला सपोर्ट

गश्मीरने सोशल मिडीयावर त्याच्या चाहत्यांसोबत प्रश्न - उत्तरांचं सेशन केलं. यावेळी गश्मीरला त्याच्या फॅन्सनी अनेक प्रश्न विचारले. एका फॅनने गश्मीरला प्रश्न विचारला.

या कठीण दिवसांमध्ये मराठी इंडस्ट्रीने सपोर्ट केला का? असा प्रश्न गश्मीरने विचारला.

या प्रश्नावर गश्मीरने उत्तर दिलं.. मराठी इंडस्ट्रीतील काही मोजक्या आणि समजुतदार लोकांनी या कठीण काळात साथ दिली. विशेष म्हणजे प्रवीण तरडे, रितेश देशमुख आणि मृण्ययी देशपांडे. ही फार चांगली माणसं आहेत. आणि त्यांना विसरणं शक्य नाही.

gashmeer mahajani after his father ravindra mahajani death marathi film industry actor support him after

वडीलांच्या निधनानंतर काय म्हणाला गश्मीर?

गश्मीर महाजनीने वडील रविंद्र महाजनींच्या निधनाबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट करुन लिहीलं होतं की... ताऱ्याला ताऱ्यासारखंच राहू द्या.. मी आणि माझे कुटूंबीय आम्ही शांतच राहणं पसंत करतोय.

जर माझ्या शांत राहण्याने मला वाईट आणि मानहानी पत्करावी लागत असेल तर इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे याचा मी स्वीकार करतो.. जे गेलेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.

ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते. आणि तुमच्या कोणाही पेक्षा आम्ही त्यांना चांगलं ओळखतो. कदाचित योग्य वेळ आली की मी भविष्यात याविषयी बोलेन. अशी पोस्ट करत गश्मीरने मनातल्या भावना व्यक्त केल्यात

रविंद्र महाजनींच निधन कसं झालं?

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात रविंद्र महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह ११ जुलैला येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे.

मृत्युच्या आधी ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT