gashmir mahajani fans gives compliment as he is shah rukh khan in marathi industry SAKAL
मनोरंजन

Gashmir Mahajani: "तू मराठी मधील शाहरुख खान", फॅनने केलेल्या कौतुकावर गश्मीर म्हणाला...

गश्मीरला त्याचा एक फॅन मराठीतला शाहरुख खान म्हणालाय

Devendra Jadhav

Gashmir Mahajani News: गश्मीर महाजनी हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. गश्मीरला आपण आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अन् सिनेमांंमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गश्मीरला काही दिवसांपुर्वी टिकेला सामोरं जावं लागलं.

कारण गश्मीरचे बाबा रविंद्र महाजनींच्या निधनाने सर्वांना धक्का बसला. मुलगा म्हणुन बाबांच्या निधनानंतर गश्मीरला नाराजीला सामोरं जावं लागलं. पण आता मात्र सर्व गैरसमज दूर होत आहेत.

अशातच गश्मीरने त्याच्या फॅन्ससोबत प्रश्न उत्तरांचा सेशन केलं. त्यावेळी एका फॅनने गश्मीरला शाहरुख खानची उपमा दिली. बघा काय झालं.

(gashmir mahajani fans gives compliment as he is shah rukh khan in marathi industry)

तु मराठीतला शाहरुख खान म्हटल्यावर गश्मीर म्हणाला

गश्मीरने काल मध्यरात्री फॅन्ससोबत प्रश्न उत्तरांचं सेशन केलं. त्यावेळी गश्मीरला त्याचा एक फॅन म्हणाला, मराठी मधला शाहरुख खान आहात तुम्ही? यावर गश्मीरन दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

गश्मीर म्हणाला, "खुप छान Compliment आहे. पण मला गश्मीरच राहू द्या. छान करमणुक करेन मी तुमची." असा रिप्लाय गश्मीरने दिलाय

वडिलांच्या मृत्यूनंतर गश्मीरचं पुन्हा कमबॅक

वडिलांच्या मृत्यूनंतर गश्मीरने काही काळ मनोरंजन विश्वातुन ब्रेक घेतला होता. पण तो पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज होणार आहे. आणि ती सुद्धा एक एेतिहासीक भुमिका

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत गश्मीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच …" त्याने शेयर केलला व्हिडिओत वेगवेगळे फोटो दिसत आहेत. त्यात गश्मीर पुन्हा राजांच्या लूकमध्ये दिसतोय. मात्र या चित्रपटाचं नाव काय असेल आणि गश्मीर त्यात कोणती भुमिका साकारणार याबाबत त्याने काहीही माहिती दिलेली नाही.

मात्र त्याचे चाहते त्याला या लूकमध्ये पाहून खुप उत्साहीत झाले आहे. ते त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत. तर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये गश्मीरला छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत पाहायचे असल्याचं सांगितले आहे.

गश्मीरच्या नव्या भुमिकेची सर्वांना उत्सुकता

देऊळ बंद', 'कॅरी ऑन मराठा', 'वन वे तिकिट', 'मला काही प्रॉब्लेम नाही' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता गश्मीर महाजनीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

त्याचबरोबर गश्मीरने 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT