Gauahar Khan and Zaid Darbar announce pregnancy, share video sakal
मनोरंजन

Gauahar Khan Pregnancy: गौहर खानने दिली गुड न्यूज.. 39 व्या वर्षी होणार आई..

गौहर खान आणि जैद दरबार यांच्या घरी येणार नवा पाहुणा..

नीलेश अडसूळ

Gauahar Khan Pregnancy: सध्या बॉलीवूडमध्ये अत्यंत आनंददायी वातावरण आहे. कारण रोज काहीतरी गोड बातमी समोर येत आहे. कुणी प्रेगनन्सीची न्यूज देत आहे तर कुणी मुलगा- मुलगी झाल्याची खबर. काजल अग्रवाल, सोनम कपूर, आलिया भट्ट आणि बिपाशा बासू या सगळ्या अभिनेत्री नुकत्याच आई झाल्याने त्यांच्या मातृत्वची चर्चा आहेच. अशातच बिग बॉस विजेती आणि मॉडेल गौहर खान नेदेखील गोड बातमी दिली आहे.

(Gauahar Khan and Zaid Darbar announce pregnancy, share video)

गौहर खानच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. गौहर खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. गौहर खान आणि जैद दरबार 25 डिसेंबर 2020 रोजी विवाह बंधनात अडकले. लॉकडाऊनच्या वेळी गौहर खान आणि जैद दरबारची भेट झाली, त्यानंतर त्यांची मैत्री सुरू झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर कधी झाले हे कळलेही नाही आणि दोघांनी लग्न केले आणि तब्बल दोन वर्षांनी त्यांनी गुड न्यूज दिली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

जैद दरबारचे वडील इस्माईल दरबार हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. तर आपण गौहर खानने बिग बॉसचा 7 वा सीझनची विजेती होती. गौहर खान सध्या प्रेग्नंट आहे आणि हे सांगण्यासाठी तिने इंस्टाग्रामवर एक अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने चाहत्यांना सांगितले की ती आणि तिचा पती जैद दरबार दोनाचे तीन होणार आहेत.

गौहर खानने इंस्टाग्रामवर एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये जैद दरबार आणि गौहरचे अॅनिमेटेड वर्जन कॅरेक्टर आहेत. ते बाईकवर जाताना दिसत आहेत. आणि सोबत लिहिले आहे की, "जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा एकाचे दोन झालो आणि आता हा प्रवास पुढे सरकत आहे.. आता आम्ही दोनाचे तीन होणार आहोत." दोघांचेही चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT