Gauahar Khan 
मनोरंजन

Gauahar Khan: "आधी चोराला पकडा.." फ्लाइटमध्ये गौहरचं सामान चोरीला! एअरलाईन्सला धरलं धारेवर

Vaishali Patil

Gauahar Khan: बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिची गणना लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये केली जाते. ती प्रसिद्ध टिव्ही स्टार देखील आहे. तिने चित्रपट वेबसिरिज मधुनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती आई झाल्यानंतर तिने काही काळ कामातुन ब्रेक घेतला आहे.

मात्र ती सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. दरम्यान आता गौहरसोबत असं काही झालं आहे की त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

गौहर नुकतीच दुबईहून मुंबईला परतली. त्यावेळी तिचे काही सामान चोरीला गेले आहे. तिने याबद्दल पोस्ट शेयर करत एअरलाइन्सवर टीका केली आहे.

या पोस्टमध्ये तिने सांगितले की, फ्लाइटमध्ये तिचा सनग्लासेस चोरीला गेला आहे. विमान कंपनीने या प्रकरणाकडे लक्ष द्यावं अशी विनंतीही तिने केली.

एअरलाइन्सला टॅग करत ती लिहिते की, "काल तुमच्या दुबई ते मुंबई या फ्लाइट ek508 मध्ये माझा सनग्लासेस चोरीला गेला होता, मी जेव्हा उतरले तेव्हा तो त्या फ्लाइटमध्येच राहिला होता आणि मी लगेच इंडियन एअरलाइन्सशी संपर्क साधला. ग्राउंड स्टाफला देखील याबाबत माहिती दिली.

तो म्हणाला की माझ्या सीटच्या खिशात 9j ची जोडी सापडली होती पण मला आश्चर्य वाटले की माझ्यासाठी दिलेल्या पॅकेटमध्ये जी दुसरी जोडी होती ती माझी नव्हती.

मी तुमच्या हेल्पलाईन क्रमांकावर अनेक वेळा कॉल केला आणि पुराव्यासह ईमेल पाठवले आहेत, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही... तुमच्या नामांकित एअरलाइनमध्ये कॅमेरे बसवलेले आहेत जे सेवेसाठी मोठी रक्कम आकारतात. कृपया चोराचा शोधा" आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

गौहर खान बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीचा एक भाग आहे. तिने 'इशकजादे', 'बेगम जान' अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.

'झलक दिखला जा 3', 'बिग बॉस 7' आणि 'खतरों के खिलाडी 5' सारख्या टीव्ही रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली. इतकच नाही तर ती बिग बॉस सिझन 7 ची विजेती देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

कफ सिरप एकच दिवस पाजलं, २२ दिवसात १६ वेळा डायलिसिस; तरीही लेकीला गमावलं, १२ लाख बिल

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या मुलीकडून मागितले न्यूड फोटो; ऑनलाइन गेम खेळताना अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर....

Navid Mushrif Vs Shoumika Mahadik : गोकूळ दूध संघाकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंडवा गंडवीची चलाखी, प्रकरण अंगलट येणार?

Flight Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला फटका! दिवाळीपूर्वी रस्तेसह हवाई वाहतूक सेवा महागली; काय आहेत दर?

SCROLL FOR NEXT