gaur gopal das funny interaction with media at mumbai airport video viral  SAKAL
मनोरंजन

Gaur Gopal Das: आमच्यावर नाराज नाही होणार? पापाराझीने एअरपोर्टवर गौर गोपाल दास यांना विचारताच स्वामी म्हणाले,...

गौर गोपाल दास यांचा मुंबई एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Gaur Gopal Das Viral Video News: इस्कॉन मंदिराशी संबंधित व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणजे गौर गोपाल दास. गौर यांच्या अनोख्या शैलीने तरुण वर्ग त्यांचा मोठा फॅन आहे.

तरुणांना आवडणारी भाषा वापरुन गौर गोपाल दास भगवद्गीता सारख्या अनेक धार्मिक ग्रंथांचा अर्थ सोप्पा करुन सांगतात. त्यामुळेच गौर गोपाल दास यांचे लेक्चर ऐकायला मोठी गर्दी जमते. गौर गोपाल दास यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. यात ते मुंबई एअरपोर्टवर मिडीयासोबत मजा - मस्ती करताना दिसत आहेत.

(gaur gopal das funny interaction with media at mumbai airport video viral)

गौर गोपाल दास यांचा मुंबई एअरपोर्टवरचा व्हायरल व्हिडीओ

विरल भयानीने त्याच्या सोशल मिडीया पेजवर गौर गोपाल दास यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत स्वामी हसत हसत मुंबई एअरपोर्टवर येताना दिसत आहेत.

यावेळी पापाराझी त्यांच्यासमोर गर्दी करुन उभे असतात. एक बोलतो, "आज आम्ही तुम्हाला पाहिलं. आता आमचा दिवस छान जाईल."

इतक्यात समोर काहीतरी गडबड होते. स्वामी म्हणतात, "असे सांभाळून. जास्त एक्साईट झालास वाटतं."

स्वामीजी आमच्यावर नाराज होऊ नका प्रश्नावर गौर गोपाल दास म्हणाले

विरल भयानीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळतं. एक पापाराझी त्यांना म्हणतो,"स्वामीजी आमच्यावर कधी नाराज नका होऊ. फक्त सांगतोय, की कधी आम्हाला पाहिलं तर नाराज नका होऊ."

यावर स्वामीजी हसत म्हणतात,"मी का नाराज होईल? नाराजीचं काही कारण नाही." असं म्हणत स्वामी सर्वांना बाय बाय म्हणत आत जातात.

मराठी आणि हिंदी कार्यक्रमात गौर गोपाल दास यांची उपस्थिती

गौर गोपाल दास यांचं इंग्रजी, हिंदी, मराठी अशा भाषांवर प्रभुत्व आहे. ते इंग्रजी जितकं व्यवस्थित बोलतात तितकंच त्यांचं मराठी आणि हिंदी अस्खलित आहे.

गौर गोपाल दास यांनी आजवर द कपिल शर्मा शो, चला हवा येऊ द्या अशा लोकप्रिय शोमध्ये हजेरी लावली आहे. गौर गोपाल यांना ऐकायला अनेक मराठी -हिंदी सेलिब्रिटी गर्दी करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Done Maharaj Bhakankun : 'अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा ते 'भारत हिंदू राष्ट्र होणार...'; श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीत डोणे महाराजांची भाकणूक, तिसऱ्या महायुद्धाबाबतही केली भविष्यवाणी

Supreme Court : १०० टक्के इथेनॉल इंधन कुठून येणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

Ratnagiri Alphonso Mango : दिवाळीत चाखायला मिळणार हापूस! रत्नागिरीतील गावखडीत ऑक्टोबरमध्येच आंब्याची पहिली पेटी तयार; 21 हजार रुपयांचा दर अपेक्षित

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

Rahul Gandhi: ‘राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या’; राहुल गांधींचे महारॅलीसाठी देशवासीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT