gaurav more dance in london street shah rukh khan ddlj song maharashtrachi hasyajatra boyz 4 SAKAL
मनोरंजन

Gaurav More Video: लंडनच्या रस्त्यांवर गौरव मोरेने केला DDLJ मधल्या शाहरुखच्या गाण्यावर डान्स

गौरव मोरेचा एक लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याने लंडनच्या रस्त्यावर शाहरुख स्टाईल डान्स केलेला दिसतोय

Devendra Jadhav

Gaurav More Dance Video: सध्या बॉईज 4 सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. नुकताच या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मिडीयावर चांगलाच धूमाकूळ घातला. या सिनेमात अभिनेता गौरव मोरे भूमिका साकारणार आहे.

बॉईज 4 सिनेमात गौरव विशेष भूमिकेत दिसणार आहे. बॉईज 4 चं शूटींग लंडनमध्ये झालंय. गौरवने लंडनमधल्या रुफटॉप बसवरचा एक व्हिडीओ शेअर केला. गौरवने शाहरूख खानच्या गाजलेल्या DDLJ गाण्यावर डान्स केलाय.

(gaurav more dance in london street shah rukh khan ddlj song)

गौरव मोरेचा DDLJ गाण्यावर भन्नाट डान्स

गौरव मोरेने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात टीशर्ट आणि जॅकेट अशा खास लूकमध्ये दिसतो. या व्हिडीओत गौरव मोरे लंडनच्या रस्त्यावर धावणाऱ्या ओपन डबल डेकर बसमध्ये प्रवास करताना दिसतोय.

गौरवने शाहरुखच्या गाजलेल्या हो गया है तुझको तो प्यार सजना गाण्यावर डान्स केलाय. गौरवने खास हावभाव करत लंडनच्या बसवर धम्माल डान्स केलाय. बॉईज 4 च्या शूटींगवेळी गौरवने हा डान्स केल्याचं समजतंय.

बॉईज 4 च्या ट्रेलरमध्ये गौरव मोरेने आणली मजा

बॉईज 4 चा ट्रेलर काल रिलीज झाला. ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, ढुंग्या - धैर्या आणि कबीर आता कॉलेजला गेले आहेत. अशातच धैर्या, ढुंग्या आणि कबीरमध्ये फूट पडल्याचे दिसतेय.

अशातच ट्रेलरमध्ये केस चपटे करुन गौरव मोरेची एन्ट्री होते. गौरव अस्खलित मराठी बोलताना दिसतो. याशिवाय गौरव विविध लूकमध्ये कॉमेडी करताना दिसतो. एकूणच अनेक मराठी कलाकार असूनही गौरव मोरे सगळ्यांमध्ये भाव खाऊन जातो.

बॉईज 4 या ताररखेला होणार रिलीज

बॉईज ४ ची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे दिसतेय आणि फक्त धमालच वाढली नसून धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज ४' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २० ऑक्टोबरला बॉईज 4 चित्रपटगृहात बघायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s Premier League: महिला प्रीमियर लीगचा धडाका आजपासून; डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार पहिला टप्पा !

Tiger Reserve New Rules : आता वाघाचा फोटो काढणं पडणार महागात! ‘या’ व्याघ्र प्रकल्पाने लागू केले कडक निर्बंध, काय आहेत नवे नियम?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत शिंदेंच्या शिंवसेनेला खिंडार

Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला ऑफिससाठी पारंपरिक लूक हवाय? काळ्या साड्यांचे हे ७ स्टायलिश पर्याय तुमच्यासाठी ठरतील परफेक्ट

SCROLL FOR NEXT