gaurav more viral video on social media during parinirvaan movie shooting in sangli SAKAL
मनोरंजन

Gaurav More: सांगलीतल्या विद्यार्थ्यांच्या वह्या दिल्या कारण... गौरव मोरेचा भारावून टाकणारा व्हिडीओ

गौरव मोरे सध्या सांगलीत महापरिनिर्वाण सिनेमाचं शूटींग करत आहे

Devendra Jadhav

Gaurav More Viral Video News: गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेता. गौरवने आजवर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विविध व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

गौरव मोरे सध्या परिनिर्वाण सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. गौरव मोरेने या शूटींगदरम्यानचा एक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केलाय.

(gaurav more viral video on social media during parinirvaan movie shooting in sangli)

गौरव मोरेने शेअर केला खास व्हिडीओ

गौरव मोरेने एक खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत गौरव एका रुममध्ये दिसतोय. त्याच्या रुममध्ये काही शालेय विद्यार्थ्यांच्या वह्या दिसत आहे. गौरवने इतक्या वह्या का आणल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

गौरव मोरे या सर्व वह्यांवर त्याचा ऑटोग्राफ देत आहे. गौरवचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

शाळेतल्या मुलांनी गौरवला दिल्या वह्या

हा व्हिडीओ शेअर करताच गौरव म्हणतो, "सांगलीत ( महापरिनिर्वाण) सिनेमाच्या निमित्ताने गेलो होतो आणि जिथे शूट करत होतो त्याच्या बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना समजले की माझं शूटिंग चालू आहे तर मुलं रोज फोटो काढायला आणि ऑटोग्राफ घ्यायला येत होती.तर त्या दिवशी असा हा ऑटोग्राफ चा खच माझ्याकडे आला तो हा क्षण थँक्यू सो मच लहान लहान बच्चूना एवढं प्रेम दिल्ल्याबद्दल……"

गौरव मोरे परिनिर्वाण सिनेमात. काय आहे सिनेमाची कथा?

गौरव मोरे परिनिर्वाण सिनेमात अभिनय करत आहे. या सिनेमात प्रसाद नामदेव व्हटकरांची भूमिका साकारत आहे. नामदेव व्हटकर एक किमयागार होते. कारण बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लोटलेला जनसागर या एकमेव अवलियाने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. त्यावेळी लाखो जनता रस्त्यावर उतरली. देशाचा श्वास रोखून धरणारा हा क्षण नामदेव व्हटकर यांनी चित्रित केला. जवळपास ३००० फुटांची रिळ व्हटकर यांनी तयार केली. त्यांच्यामुळेच आज आपण परिनिर्वाणाची दृश्य पाहू शकतो. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT