Shahrukh Khan Latest News:  Esakal
मनोरंजन

#AskSRK: वहिनी घरातले काम सांगते का? शाहरुख म्हणतोय, 'अरे बेटा...'

Vaishali Patil

Shahrukh Khan Latest News: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या चित्रपटानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.

मात्र त्याचबरोबर शाहरुख खान त्याच्या चांगल्या सेन्स ऑफ ह्यूमरसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं फनी उत्तर तो देत असतो.

पठाण वेळी शाहरुखनं ट्विटरवर #AskSRK सत्राची सुरवात केली होती. त्यात त्याने अगदी सामान्य आणि साध्या प्रश्नाची उत्तरही दिली होती.

आताही तो त्याच पद्धतिने चाहत्यांशी जोडला जातो. सोमवारी पुन्हा एकदा आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान शाहरुख त्याच्या चाहत्यांसमोर आला आणि त्याने प्रत्येक प्रश्नाला त्याच्या खास शैलीत उत्तरे दिली.

दरम्यान, त्यांनी पुन्हा #AskSRK सत्र आयोजित केल्यानंतर सोशल मडियावर शाहरुखची चर्चा सुरु झाली. या #AskSRK मध्ये लोकांना उत्तरे त्याला बरिच प्रश्न विचारले.

चाहत्यांना अनेक मजेदार प्रश्न विचारले. एका चाहत्याने विचारले की, तो #AskSRK हे सत्र फक्त 15 मिनिटांसाठी का ठेवतो, वहिनी घरातले काम तुला करायला लावते का? या मजेशीर प्रश्नाला किंग खानने मजेशीर उत्तर दिले. ज्याची सोशल मिडियावर चर्चाच सुरु झाली.

#AskSRK सत्रादरम्यान, अभिनेत्याने उत्तर दिले, "बेटा, तुझी गोष्ट आम्हाला नको सांगू... जा घराची साफ सफाई कर."

शाहरुखचं हे उत्तर वाचून नेटकरी खुपच हसले आहेत. त्याच उत्तर सोशल मिडियावर खुप व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांनी त्याला प्रतिक्रियादेखील देण्यास सुरवात केली शाहरुखसारखा कॉमेडी माणूस असूच शकत नाही.

असं काहीजण म्हणताय तर काहींनी लिहिलय. आम्हाला हसू आवरता येत नाही आहेत. तर याशिवाय अनेकांनी इतरही अनेकांनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत. असे अनेक फनी उत्तर शाहरुखनं त्याला विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांना दिलं आहे.

पठाण च्या दमदार यशानंतर शाहरुख खान आता पुन्हा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. तो आता अॅटलीच्या 'जवान' मध्ये दिसणार आहे.

ज्यात नयनतारा आणि विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिकेत आहेत

शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा मोठा चित्रपट जवान 7 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. यापूर्वी तो जूनमध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव ते सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले

शाहरुखचा डंकीही याच वर्षी रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, या संदर्भात शाहरुखने नुकताच काश्मीरचा दौरा केला होता.

तर बातम्यांनुसार, 'टायगर 3' चित्रपटात अभिनेत्याचा एक खास कॅमिओ देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : कागल मध्ये मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाची माघार

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

SCROLL FOR NEXT