gauri khan and shah rukh khan Sakal
मनोरंजन

Pathaan: 'रेकॉर्ड तोड...', 'पठाण'च्या यशादरम्यान शाहरुखची पत्नी गौरी खानने पोस्ट केली शेअर

शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट एकापाठोपाठ एक रेकॉर्ड तोडत आहे. गौरी खानने आता पठाणच्या यशावर एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खानच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 25 जानेवारीपासून किंग खानचा चित्रपट कमाईच्या बाबतीत सातत्याने रेकॉर्ड तोडत आहे. यादरम्यान कार्तिक आर्यनपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट आले, पण पठाणच्या झंझावातात सगळे उखडले. आता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने इन्स्टाग्रामवर 'पठाण'च्या कमाईबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

गौरी खानने तिच्या पतीच्या यशावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे. गौरीने इन्स्टाग्रामवर पठाणच्या कलेक्शनबद्दल लिहिले आहे.

गौरीने चित्रपटाच्या 1026 कोटींच्या जगभरातील कलेक्शनसह पोस्टर शेअर केले आहे आणि कॅप्शन लिहिले आहे- 'रेकॉर्ड ब्रेकिंग स्ट्रीक...#पठान.' गौरी खानच्या या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शाहरुख खाननेतब्बल 4 वर्षांनंतर पठाणसोबत दमदार कमबॅक केले आहे. 'पठाण' एकामागून एक नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, भारतात आतापर्यंत 528.89 कोटींची कमाई झाली आहे.

वर्ल्डवाइड चित्रपटाच्या कलेक्शनने 1026 कोटींचा आकडा पार केला आहे. पठाण हा एकाच रिलीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT