gauri sawant transgender shared post for actress sushmita sen who playing her role in taali web series  sakal
मनोरंजन

Taali: माझा रोल तू करणार म्हणजे.. सुष्मिता सेनसाठी गौरी सावंतची खास पोस्ट..

रवी जाधव दिग्दर्शित 'टाली' या वेब सिरिजमध्ये सुष्मिता सेन गौरी सावंत या तृतीयपंथीची भूमिका साकारणार आहे.

नीलेश अडसूळ

Taali: 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी!' म्हणत सुष्मिता सेननं एक पोस्ट टाकली ती चर्चेचा विषय ठरली. अभिनेत्री सुष्मिता सेन लवकरच एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत येत आहे. ती प्रथमच एका तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. लवकरच एका नव्या वेब सीरिजमधून सुष्मिता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेब सीरिजचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक करणार आहे. तृतीयपंथी म्हणून जगभर ख्याती पोहोचलेल्या गौरी सावंत हिच्या आयुष्यावर ही वेब सुरुज असून 'टाली' असे या सिरिजचे नाव आहे. त्याच गौरी सावंतने आज सुष्मितासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

(gauri sawant transgender shared post for actress sushmita sen who playing her role in taali web series )

साडी, लाल टिंकली, हातात खड्याळ अन् गळ्यात माळ आणि टाळी वाजवत असलेला सुष्मिताचा लुक सध्या चर्चेत आहे. पण ही छबी आहे तृतीयपंथी गौरी सावंत हिची. रवी जाधव गौरी सावंतच्या आयुष्यावर एक वेब सिरिज करत आहे. ज्याचे लेखन क्षितिज पटवर्धन याने केले आहे तर गौरी च्या भूमिकेत सुष्मिता सेन आहे. आजवर तृतीयपंथी व्यक्तीच्या भूमिका साकारण्यासाठी कायमच पुरुषांना प्राधान्य दिलं गेलं पण प्रथमच एक स्त्री पात्र तृतीयपंथीची भूमिका साकारत आहे.

म्हणूनच गौरी सावंतने सुष्मिता साठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सुष्मितासोबत एक फोटो शेअर करत ती म्हणते, 'आम्ही मूळ बायकाच.. त्यात माझी भूमिका तू करणार म्हणजे दुग्धशर्करा योग.. हा माझ्या समाजाचा खूप मोठा सन्मान, तुझ्या धाडसाला त्रिवार सलाम..' या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन त्यांना आणि सुष्मिताला या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'टाली'च्या टीम सोबत आणखी एक फोटो पोस्ट करत गौरी म्हणते 'कोण म्हणतं परिवार नाही.. दिवसेंदिवस तुमच्या सारख्या गोड माणसांची भर पडतच चाललीये.. समानतेच्या वाटेवर तुम्ही दिलेल्या प्रेमाची मी आयुष्य भर ऋणी राहीन.. आज हे लिहिताना डोळ्यांच्या कडा ओलावल्या, पण जेव्हा मी जगाचा निरोप घेईन तेव्हा तुमच्या डोळ्याचे अश्रू कोणी पुसू शकणार नाही.. देवाचे आभार.. नांदुया सौख्य भरे....' गौरीची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज विद्यार्थ्याला वडिलांची कॉलेजमध्ये घुसून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त! प्रति 100 ग्रॅममागे तब्बल 95,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

Latest Marathi News Live Update : ई-चलन विरोधात वाहतूकदारांचा संप; बस आणि ट्रक चालक आझाद मैदानाकडे रवाना

Raju Shetti : “सरकार म्हणजे शेतकऱ्यांची सावत्र आई” वेंगुर्ले मेळाव्यात राजू शेट्टींचा संताप; आंबा-काजू बागायतदरांसाठी अडीच हजार कोटींची मागणी

Maharashtra Weather Alert : राज्यात उन्हाचा भडका की पावसाची एन्ट्री? पुढील 48 तास ठरणार निर्णायक; हवामान खात्याचा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा!

SCROLL FOR NEXT