gautami deshpande grandfather arvind kane passed away gautami emotional post viral  SAKAL
मनोरंजन

Gautami Deshpande: गौतमी देशपांडेचे आजोबा अन् ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचं निधन

गौतमी आणि अरविंद या दोघांनी एकाच मालिकेत अभिनय केलाय

Devendra Jadhav

Arvind Kane Death: गोतमी देशपांडेचे आजोबा आणि ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. गौतमीने आजोबांसाठी भावुक पोस्ट शेअर करुन ही दुःखद बातमी सोशल मिडीयावर शेअर केली.

गौतमी आणि अरविंद यांनी माझा होशील ना या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केलं होतं. अरविंद यांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती समोर येत आगे.

गोतमीने सोशल मिडीयावर भावुकांसाठी भावुक पोस्ट शेअर केलीय. गौतमी म्हणाली, "प्रिय आजोबा, पत्रास कारण कि , आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला ! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची , आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळया भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं ..... पण आजोबा काय सांगू तुम्हाला ....इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका ! प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपलं तुम्ही ... कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं .... सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून .... नंतर आईचा पुनर्विवाह ....नवीन कुटुंबामध्ये प्रवेश .... नवीन भावांचं सख्ख्यांपेक्षा जास्त प्रेम ...."

गौतमी पुढे लिहीते, "तुमच्यासारख्या handsome नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश .....नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम ....लग्न ..... दोन गोड मुलांचा जन्म .... सारंच कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असं ....
तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा ... "एखाद्याचं नशीब" म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात अली ...नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले . मग " याला जीवन ऐसे नाव" म्हणत तुम्ही पुढे गेलात ... "अशी पाखरे येती" म्हणत संसार सुरु झाला .... "नाटककराच्या शोधात तुम्ही सहा पात्र" फिरत गेलात ....पुढे "शेहेनशाह" बनून तुम्ही "नटसम्राट" असल्याचं दाखवून दिलंत .... दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं "तो मी नव्हेच " म्हणत राहीलात .... असे आयुष्याचे खरे खुरे "किमयागार " ठरलात ..... "चाणक्य " बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात .... तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही ....."

गौतमी पुढे लिहीते, "प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो ... यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय .... त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणार आहोत आयुष्यभर ....
तुम्ही आता मात्र शांत व्हा ....दमला असाल तुम्ही .... आता खऱ्या अर्थाने पडदा पडला आहे ...नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे ....
तुमच्यातला हा 'नट " आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू .... अन तुमच्या 10% तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू ....
तुमच्याच एका प्रवेशातलं हे वाक्य ....झालेत बहू ,असतील बहू , होतील बहू ,पण या सम हा ....!!
रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते....अन त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते ....तुमची नात आणि तुमची फॅन.. गौतमी"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT