Gautami Deshpande  Esakal
मनोरंजन

Gautami Deshpande: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे पैसे अडकवले ! थेट स्क्रिनशॉट शेयर करत म्हणाली,..

अभिनेत्री गौतमी देशपांडे हल्ली चर्चेत असते ते तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. ती सध्या रिल्स मुळे सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते.

Vaishali Patil

Gautami Deshpande Post: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडे ही सोशल मीडियावर चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. गौतमी देशपांडेला आपण आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधून पाहिलंय. 'झी-मराठी'वरील 'माझा होशील ना' या मालिकेतून तर ती घराघरात पोहोचलेली आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे हल्ली चर्चेत असते ते तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. ती सध्या रिल्स मुळे सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. गौतमी आणि मृण्मयी या दोघी बहिणी सतत काहीतरी नवीन पोस्ट करत असतात. मात्र आज गौतमी ही तिच्या इंस्टास्टोरीमुळे चर्चेत आली आहे. तिचे पैसे कुणीतरी अडकवले आहेत.

तिने काम केले मात्र त्याच मानधन तिला अजूनही मिळालेलं नाही. बऱ्याचवेळा विचारणा करुनही काही फायदा न झाल्यानं गौतमीने आता थेट इंस्टाला स्टोरी टाकत याबाबत विचारणा केली आहे.

गौतमीने व्हास्टअॅप चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात गौतमीने सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले का? याबाबत विचारणा केली आहे. तर त्या व्यक्तीनेही 'थांबा, चेक करते’ असं उत्तर दिले आहे.

यानंतरही तिला तिचे पैसे मिळालेले नाही त्यानंतर गौतमीने पुन्हा मेसेज केला आहे ज्यात ती लिहिते की, मी तुमच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. कलाकाराला एकाच गोष्टीसाठी इतक्या वेळा पाठपुरावा करावा लागतो हे खरोखरच दुर्दैवी आहे. सोमवारपर्यंत माझे पैसे ट्रान्सफर करा'

हा मेसेज केल्यानंतर समोरील व्यक्तीने तिला साधा रिप्लायही दिलेला नाही. त्यामुळे तिने दुसऱ्यादिवशी पुन्हा मेसेज केला आहे ज्यात तिने लिहिले आहे की,

तुम्ही पण उत्तर देऊ शकत नाही का? जर तुमच्याकडे मेसेजचे उत्तर देण्या इतकंही सौजन्य नसेल तर मी हे सगळं इंस्टाग्रामवर टाकते आहे.

आता गौतमीने हा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा फोटो शेयर करत तिने लिहिलं की,

“जेव्हा प्रश्न पैशांचा येतो…तेव्हा ही लोक अशी वागतात. मला यावेळी खरंच खूप वाईट वाटतंय. आपण काम करतो आणि त्याचा मोबदला आपल्याला असा मिळतो. स्वत:च्या पैशांसाठी आपल्यालाचा असा पाठपुरावा करावा लागतो.”

गौतमीने फक्त स्क्रिनशॉट टाकला आहे. यात तिने कुणाचेच नाव घेतलेले नाही किंवा कुणालाही टॅग केलेले नाही. तिने फक्त तिला तिच्या कामाचा मोबदला देण्यात यावा यासाठी ही पोस्ट शेयर करत मागणी केली आहे.

जेव्हा एखादी मेहनत घेतो आणि काम करतो मात्र त्याचा योग्य मोबदला किंवा मानधन मिळत नाही तेव्हा मनस्ताप होतोच. मग ते कलाकार असो किंवा सामान्य व्यक्ती. तसाचं काहीसा अनुभव अभिनेत्री गौतमी देशपांडेला आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ आला रे आला! रितेश देशमुखची ग्रँड एंट्री

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

IND vs NZ: किंग कोहलीची घौडदौड कायम; रचला आणखी एक विश्वविक्रम; सचिन तेंडुलकर, संगकाराला टाकलं मागे

Employees DA: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT