gautami deshpande wedding mrunmayee deshpande special post viral  SAKAL
मनोरंजन

Gautami Deshpande Wedding: "...तर गाठ माझ्याशी आहे!!!!" लग्नानंतर धाकट्या बहिणीसाठी मृण्मयीचा सल्ला

गौतमीच्या लग्नानंतर मृण्मयीने खास पोस्ट लिहीली आहे

Devendra Jadhav

Mrunmayee post for Gautami Deshpande Wedding: गौतमी देशपांडेने नुकतंच बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकरसोबत लग्न केलं. गौतमीच्या लग्नासाठी मराठी मनोरंजन विश्वातील सर्व कलाकार एकत्र आले होते.

गौतमीच्या लग्नानंतर तिची बहिण आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिच्यासाठी खास पोस्ट लिहीली आहे.

मृण्मयी लिहीते, "अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं... प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली... या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये... आनंद..काळजी..आता ती officially दुसऱ्याची झाली याचं दुःख.. आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद..

मृण्मयी पुढे सांगते, "सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत... काल परवा पर्यंत ताईचे शेपूट असणार आमचं बाळ ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे.. यापुढे आम्हा बहिणींची gossips एकतर्फी नसतील.. आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ,”ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल... कारण..? तिचं तिलाच कळेल!"

मृण्मयी पुढे सांगते, "स्वानंद.. तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये... लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होतासच... गौतमी स्वानंदची काळजी घे... स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस... संसार कोणाचाच सोपा नसतो.. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणी वरती मात करता येते.. कदाचित सहज नाही... पण मात करता येते!!"

मृण्मयी शेवटी सांगते, "एकमेकांवर विश्वास असू द्या... संवाद असू द्या... नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते... एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा... एकमेकांना सांभाळून घ्या... आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत.. सगळ्यांची काळजी घ्या... आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हनीन."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT