gautami deshpande wedding with swanand tendulkar photos viral SAKAL
मनोरंजन

Gautami Deshpande Wedding: अन् गौतमी स्वानंदची झाली! थाटात पार पडला लग्नसोहळा; फोटो व्हायरल

गौतमी देशपांडेच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत

Devendra Jadhav

Gautami Deshpande Wedding News: गौतमी देशपांडे ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीने काहीच दिवसांपुर्वी ती लग्न करणार असल्याची बातमी सर्वांसोबत शेअर केली. त्यामुळे गौतमीच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता होती.

अखेर गौतमी तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. गौतमीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले असून लोकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

गौतमी - स्वानंदचा लग्नसोहळा

गौतमी देशपांडेने आज स्वानंदसोबत लग्न केलंय. नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत गौतमीने लग्न केलंय. गौतमीच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.

गौतमी - स्वानंदने लग्नात एकमेकांना मॅचिंग असे कपडे परिधान केले असून त्यांच्या खास मुंडावळ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय. गौतमी - स्वानंदच्या लग्नाबद्दल आणखी अपडेट आम्ही तुम्हाला देत राहूच

कोण आहे गौतमीचा होणारा नवरा?

गौतमी देशपांडे तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकर सोबत लग्न करणार आहे. स्वानंद हा एक इनफ्लुएन्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे. स्वानंद भाडिपा या प्रसिद्ध युट्यूब चॅनलमध्ये सक्रिय आहे. स्वानंद एक डिजीटल क्रिएटर असून त्याचे अनेक रिल्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. गौतमी - स्वानंदच्या चाहत्यांनी त्यांचं कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलंय.

गौतमी देशपांडे करणार लग्न!

गौतमीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने लग्न करणार असल्याची घोषणा केली. गौतमीने हे फोटो शेअर करताना लिहिलंय की, "माझ्या सिक्रेट सांताचं आगमन थोडं लवकर झालंय. खुप आनंद आणि प्रेम", असं कॅप्शन देत गौतमीने ही खास बातमी शेअर केली होती. आता गौतमीचं लग्न झाल्याने सर्वांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT