Gautami Patil Comment on Her Marry Esakal
मनोरंजन

Gautami Patil: 'लवकरच लग्नाला या' गौतमी लागली तयारीला!लग्नाबद्दलच्या प्रश्नावर लाजत म्हणाली,...

सकाळ डिजिटल टीम

"माझी लावणी नाही माझा डिजे शो" असतो असं म्हणतं अख्या तरुणाईला आपल्या डान्सनं वेड लावणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. ती सध्या खुपच चर्चेत आली आहे. तिचं सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य तुम्ही हमखास ऐकलं असणार.

हे नाव आता गल्लीबोळात पसरल आहे. ती नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतचं तिच्या कार्यक्रमात पत्र्याच शेड कोसळून अनेक तरुण जखमी झाले होते.

त्याचबरोबर नुकतच सोलापूरमधल्या बार्शी या ठिकाणी गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच ही तक्रार दाखल केली आहे.

कधी तिच्या कार्यक्रमामुळे तर कधी तिच्यावर कोणी केलेल्या वक्तव्यामुळे किंवा तिच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे.

गौतमीच्या नृत्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिचे कार्यक्रमही खुप गाजतात.

मात्र ती जितकी वादात असते ती तितकिच तिची क्रेझही आहे. तरुणाईला तिनं डान्स अन् हावभावने भुरळ पाडली आहे.

तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. तिची झलक पाहण्यासाठी लोक आतुर असतात असं काहीस चित्र सध्या दिसत आहे. गौतमी ही अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली.

आता पुन्हा गौतमी चर्चेत आली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणुन घेण्यास चाहते उत्सूक असतात.

त्यातच काही दिवसांपुर्वीच तिनं तिच्या जोडीदाराबद्दल सांगतिलं होतं. गौतमीला कोणत्याही मुलाखतीत किंवा कार्यक्रमात तू लग्न कधी करणार हा प्रश्न हमखास विचारला जातो. आता याच प्रश्नाचं उत्तर गौतमीनं एका मुलाखतीत दिली.

एका वृत्तवाहिनीला गौतमीने मुलाखत दिली. यामुलाखतीत तिने बऱ्याच मुद्यावर भाष्य केलं. त्यातच तिनं ती लग्न कधी करणार याबद्दलही सांगितलं.

जेव्हा तिला लग्नाबाबत विचरलं त्यावेळी गौतमी लाजली. तिचा चेहरा लाल पडला होता. लाजत तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं.

ती म्हणाली की, मी सध्या लग्नाचा विचार करत नाही. पण लवकरच मी लग्न करणार आहे. मी तुम्हाला सर्वांना लग्नाचं आमंत्रण देईन. जसं माझ्या कार्यक्रमात गोंधळ घालतात तसचं तुम्ही लग्नाला या आणि तिथेही गोंधळ घालून जा अशी कोपरखळी देखील गौतमीनं काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT