Gautami Patil: Esakal
मनोरंजन

Gautami Patil: तर मग मी नाचणं सोडेन! गौतमीनं दिला इशारा

जर कार्यक्रमाचं आयोजन व्यवस्थित नसेल तर गौतमी यापुढे तिचे डान्स शो करणार नाही असा स्पष्ट इशारा तिनं यावेळी दिला.

Vaishali Patil

Gautami Patil: 'सबसे कातील गौतमी पाटील' हे असं वाक्य होतं जे गेल्या काही दिवसांपासून खुप चर्चेत होतं. नृत्यांगना असलेली गौतमी ही नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या डान्स शोला चाहत्यांची तुफान गर्दी होते. मात्र गेले काही दिवस गौतमीची चर्चा कमी झाली होती. तिचे शो देखील बंद होते.

बऱ्याच दिवसांनंतर काल 1 ऑगस्टला गौतमी पाटीलचा शो अहमदनगरच्या नागापूरमध्ये झाला. यावेळी नेहमी प्रमाणे तिच्या शोमध्ये तरुणांची तुफान गर्दी झाली होती. अगदी लहान मुलांपासून महिला आणि वृध्दांपर्यंत सर्वच या कार्यक्रमात आले होते.

नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीचा वाढदिवस होता. यावेळी नातीचा वाढदिसानिमित्त गौतमीला बोलावण्यात आलं होतं. तिचा डान्स सुरु असतांनाच कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ सुरु केला. तर काहींनी किरकोळ दगडफेक केली.

त्या कार्यक्रमात दगड लागल्यामुळे एक महिला देखील जखमी झाली. असं सांगण्यात आलं. काही मुलांनी कार्यक्रमात गोंधळ घातल्यानं एमआयडीसी पोलीस आणि खासगी बाऊन्सर्स यांनी लगेचच वातावरण शांत केलं मात्र त्यानंतर डान्स शो पुन्हा सुरु करण्यात आला नाही. गौतमीचा शो तिथेच बंद करण्यात आला.

गोंधळामुळे कार्यक्रम रद्द झाल्यानंतर गौतमी पाटीलं तिची प्रतिक्रिया देखील दिली. यावेळी बोलतांना गौतमीनं म्हणाली की, 'आज खुप दिवसांनी माझा कार्यक्रम झाला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची खुप गर्दी असते. त्यामुळे मागच्या प्रेक्षकांना डान्स दिसत नाही.

त्यामुळे थोडा गोंधळ झाला. कार्यक्रम छान झाला मात्र गोंधळामुळे मी कार्यक्रम लगेच बंद केल. मी प्रत्येक आयोजकाला चांगल्याप्रकारे आयोजन करा. कार्यक्रमात बंदोबस्त व्यवस्थित प्रकारे करा. ज्यामुळे असा गोंधळ मारफेक होणार नाही. जर कार्यक्रमात असाच गोंधळ होत असेल तर मी यापुढे कार्यक्रम करणार नाही. कार्यक्रम करणं बंद करेल.'

जर कार्यक्रमाचं आयोजन व्यवस्थित नसेल तर गौतमी यापुढे तिचे डान्स शो करणार नाही असा स्पष्ट इशारा तिनं यावेळी दिला.

गौतमी पाटील बद्दल बोलायचं झाल तर लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांन तिने भुरळ घातली आहे. तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी असते. अश्लिल हावभाव आणि डान्स स्टेपमुळे ती चर्चेत आली होती. तिच्यावर टिका देखील करण्यात आली.

त्यानंतर जाहिररित्या माफी मागत अशी चुक पुन्हा होणार नाही असं गौतमीनं सांगितलं होतं. तिने तिच्या डान्समध्येही खुप बदल केला. गावोगावी डान्स शो करणारी गौतमी आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे.

बाबा गायकवाड यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या 'घुंगरू' सिनेमात ती दिसणार आहे. घुंगरू सिनेमात गौतमी लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT