Gautami Patil Marathi Celebrity comment  esakal
मनोरंजन

Gautami Patil On Reservation : 'हो मग आरक्षण हवंय'! गौतमीनं केली आरक्षणाची मागणी

प्रसिद्ध सेलिब्रेटी गौतमी पाटील ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते.

युगंधर ताजणे

Gautami Patil Marathi Celebrity comment : प्रसिद्ध सेलिब्रेटी गौतमी पाटील ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा म्हणून गौतमीनं अल्पावधीतच तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौतमीनं आता आरक्षणाच्या मुद्द्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

गौतमी तुला आरक्षणाविषयी काय वाटते, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावेळी तिनं दिलेल्या उत्तरानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गौतमी म्हणाली, साहजिकच आहे आज प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. मलाही आरक्षण हवं आहे. कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. गौतमीच्या त्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यापूर्वी देखील गौतमीनं अनेक विषयांवर दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत. राज्यभर गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. त्या कार्यक्रमांमध्ये होणारी हुल्लडबाजी, गोंधळ हा आता नित्याचा विषय झाला आहे. अनेक गावकऱ्यांनी गौतमीच्या कार्यक्रमांवर आक्षेप नोंदवला असला तरी तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी खूप काही सांगून जाणारी आहे.

येत्या काळात गौतमी एका मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिनचं त्या चित्रपटाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओमधून चर्चेत असणाऱ्या गौतमीच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. मराठीतील काही प्रसिद्ध लावणी नृत्यांगणांनी गौतमीच्या नाचण्यावर आक्षेपही नोंदवला होता.

गौतमीनं पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळेलच पाहिजे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळायला हवे. मला देखील आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र हवे. कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती. आता चित्र बदलले आहे.

यावेळी गौतमीनं तिची सहकारी हिंदवी पाटील हिच्याविषयी देखील प्रतिक्रिया दिलीय. ती म्हणाली, मी अकरा वर्षापासून या क्षेत्रात काम करते अनेक मुलींना मी पाहिले आहे. हिंदवीच्या वाटचालासाठी शुभेच्छा. आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत, उलट त्यांचं चांगलं होऊ दे. अशी आमची इच्छा आहे.

राजकारणावरही गौतमीनं मोकळेपणानं मत व्यक्त केलं आहे. मी अजिबात राजकारणात जाणार नाही. त्यापेक्षा नवा चित्रपट मिळाला तर करेन. चित्रपट मिळाला तरी डान्स करणे सोडणार नाही. लग्नाचं म्हणाल तर त्याचा कोणताही विचार अद्याप केलेला नाही. अशा शब्दांत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता गौतमीनं मराठा आरक्षणावर दिलेल्या प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर तिला चाहत्यांनी धन्यवाद तिचं कौतुक केलं आहे. काहींनी त्यावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT