Gautami Patil Marathi celebrity new song maza karbhar sopa nastoy esakal
मनोरंजन

Gautami Patil New Song : 'माझा कारभार सोपा नसतोय रं!' गौतमीचं नवं गाणं आलं, वादळ पुन्हा घोंघावलं

गेल्या काही दिवसांपासून गौतमीनं तिच्या नावाचा ब्रँड तयार केला आहे.

युगंधर ताजणे

Gautami Patil Marathi celebrity new song maza karbhar sopa nastoy : भल्या भल्या मराठी सेलिब्रेटींपेक्षा जिच्या नावाला प्रेक्षकांची पसंती मिळते, जिची लोकप्रियता यशाच्या शिखरावर आहे त्या गौतमीच्या नावाची क्रेझच वेगळी आहे. अल्पावधीतच गौतमीनं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गौतमीनं तिच्या नावाचा ब्रँड तयार केला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गौतमीचे होणारे कार्यक्रम त्या कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि तिच्या त्या डान्स शो ला मिळणारा प्रतिसाद प्रचंड मोठा असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यत ज्या ज्या ठिकाणी गौतमीच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तिथे प्रेक्षकांनी गदारोळ केल्याचेही सांगण्यात येते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

गौतमी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या फोटो आणि व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. गौतमीनं एखादा फोटो पोस्ट केल्यास त्यावर येणाऱ्या कमेंटस हा तिच्या चाहत्यांसाठी खास चर्चेचा विषय असतो. गौतमी जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच तिच्यावर होणारी टीकाही लक्ष वेधून घेत असते. गौतमीचा डान्स, तिचा अंगविक्षेप, हावभाव यामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

आता गौतमी चर्चेत आली आहे ते तिच्या नव्या व्हिडिओमुळे. गौतमीचं नव्या गाण्याचा टीझर आता समोर आला आहे. काही तासांपूर्वी गौतमीनं तो व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला १९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. त्या गाण्याचे बोल 'माझा कारभार सोपा नसतोय रं!' असे असून गाण्याच्या टीझरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

काही दिवसांपूर्वी गौतमी ही एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ही बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण होते. तिच्या लाखो चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत कौतुकाचा वर्षावही केला होता. एवढेच नव्हे तर गौतमीच्या नावानं एका हॉटेलमध्ये थाळी मिळत असल्याचे सांगण्यात येत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT