Gautami Patil  esakal
मनोरंजन

Gautami Patil: 'साखरपुडा झाला की काय?' फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

गौतमीचा साखरपुडा झाला की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना पडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gautami Patil marathi celebrity now photo viral: मराठी मनोरंजन विश्वामध्ये ज्या सेलिब्रेटीची नेहमीच चर्चा होते त्यामध्ये गौतमी पाटीलच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधून घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी गौतमी ही तिच्या डान्समुळे भलतीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिची वाढती लोकप्रियता ही अनेकांच्या नजरेत खुपू लागल्याचे दिसून आले. काहींनी तिचे नाव न घेता तिच्यावर टीका केली होती. लावणीचा डान्स हा त्या पद्धतीनुसारच व्हावा. मात्र गौतमीनं लावणी ही अश्लील प्रकारे सादर करुन वेगळ्या प्रकारे तिचे सादरीकरण केले आहे. तिनं हे वेळीच थांबवले नाहीतर एखाद्या दिवशी प्रेक्षक तिला स्टेजवरुन खाली ओढून मारल्याशिवाय राहणार नाहीत.

गौतमीचा सांगली जिल्ह्यातील एका गावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी एवढी प्रचंड होती की त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळाच कोसळून पडली होती. सोशल मीडियावर गौतमीविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. आता तर तिचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यावरुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

गौतमीचा साखरपुडा झाला की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना आणि तिच्या चाहत्यांना पडला आहे. नाकात नथ, नऊवारी साडी कपाळावर चंद्रकौर असा तिचा लूक नेटकऱ्यांना भलताच भावला आहे. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्यावरील आरोप कसे खोटे आहेत याविषयी सांगितले होते. त्यामुळे तिच्यावर सुरु झालेल्या चर्चेनं वेगळे वळण घेतल्याचे दिसून आले होते. गौतमीनं फार कमी वयातच कौटूंबिक परिस्थितीमुळे आपल्यावर जबाबदारी येऊन पडली. अशातच आपण लावणी शिकलो आणि परफॉर्मन्स करु लागलो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

Satara Zilla Parishad Controversy: सातारा झेडपीत पालकमंत्र्यांचाच उच्छाद; मंत्री गोरे, शिवेंद्रराजे; त्यांनी जे पेरले तेच उगवले, नेमका काय दिला इशारा!

Pune Crime: पुण्यात पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी; मुंढव्यातील घटना, तिघांना अटक..

SCROLL FOR NEXT