gautami patil says will leave husband for mother in interview sakal
मनोरंजन

Gautami Patil: तर मी नवऱ्यालाही सोडून देईल.. गौतमीची 'ही' अट तुम्हाला मान्य आहे का?

'ही' अट मान्य तरच गौतमी करणार लग्न.. आता बोला..

नीलेश अडसूळ

Gautami Patil: गौतमी पाटील हा विषय दिवसेंदिवस जास्तच गंभीर होत चालला आहे. सर्व मीडियाचे लक्ष तिच्यावर लागले आहे. या आधी तिच्या नाचावर, तिच्या हावभावावर बरीच चर्चा झाली, वाद झाले आता मात्र जरा गाडी भलत्याच ट्रॅक वर केली आहे.

सध्या गौतमी चर्चेत आहे ते तिच्या लग्नाच्या बातमी मुळे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली ज्यामध्ये ती तिला आयुष्यात कसा जोडीदार हवा, तिला लग्न करायचंय का नाही आणि तिच्या अटी काय यावर ती भरभरून बोलली आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कारण लग्न झालं आणि गौतमीची एक अट मान्य नसेल तर ती नवऱ्याला सोडायलाही तयार आहे. त्यामुळे तिच्या या विधानाची भलतीच चर्चा आहे.

(gautami patil says will leave husband for mother in interview)

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. ग्रामीण भागात तर गौतमी पाटील हे नाव काढल्या शिवाय लोकांचे कार्यक्रम होत नाहीत. एकेकाळी टीकेची शिकार झालेल्या गौतमीच्या डान्सशो साठी सध्या वेटिंग आहे.

आज असे चित्र असले तरी मध्यंतरी गौतमी नृत्य करताना अश्लील हावभाव करते म्हणून तिच्यावर टिका करण्यात आली होती. राज्यभरात बरीच आंदोलनं झाली. त्यानंतर गौतमीने माफी मागत भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केलं होतं. लवकरच ती चित्रपटातही झळकणार आहे. पण आता चर्चा आहे ती तिच्या लग्नाची..

एका मुलाखतीत ती म्हणाली, ''मी लग्न करीन.. पण मला जीवाला जीव देणारा.. सुख- दुःखात समजून घेणारा नवरा हवा.. पण मी माझ्या आईला सोडू शकत नाही. तिला माझ्याशिवाय कुणीही नाही. मी आईसाठीच काम करतेय.''

''मी लग्न करून जाईन, तर तिचं काय होईल, ती कुठे जाणार, तिला कोण सांभाळणार, असे विचार येतात. पण मी तिला एकटं सोडून कुठेही जाणार नाही, हा विषय वेगळा. आणि तशी वेळ आलीच तर मी नवऱ्याला सोडेन..” असं स्पष्ट शब्दात गौतमीने आपले विचार मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

Mahajyoti Skill Scam: महाज्योती बनली भ्रष्टाचाराचा अड्डा; महाज्योतीमध्ये ३०० कोटींचा 'कौशल्य विकास' घोटाळा?

SCROLL FOR NEXT