Gautami Patil Viral video Esakal
मनोरंजन

Gautami Patil Viral Video: अखेर सापडलाच! गौतमीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकजण ताब्यात...

Gautami Patil Viral video: सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य तुम्ही हमखास ऐकलं असणार.

Vaishali Patil

Gautami Patil Viral video: सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य तुम्ही हमखास ऐकलं असणार. कारण हे नाव सध्या अवघ्या महाराष्ट्रभर पसरल आहे. ती नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते.

कधी तिच्या कार्यक्रमामुळे तर कधी तिच्यावर कोणी केलेल्या वक्तव्यामुळे किंवा तिच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे. गौतमीच्या नृत्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिचे कार्यक्रमही खुप गाजतात.

गौतमी ही अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली. गल्लीबोळात तिच्या नावाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र प्रसिद्धीचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी एका कार्यक्रमात चेंजिंग रुममध्ये कपडे बदलत असताना कुणीतरी तिचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ संबंधित व्यक्तीने व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता. या प्रकरणी गौतमीमी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

फक्त पोलिसांनीच नाही तर राज्य महिला आयोगाने यात लक्ष घातले होते तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती.

दरम्यान गौतमीचा तो व्हिडिओ व्हायरल करणारा व्यक्ती पोलिसांना अखेर सापडला असल्याच सांगण्याता आलं आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला होता.या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलगाने शुट केला असून व्हायरल केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र तो अल्पवयीन आई-वडील आणि मुलगा यांना पोलिसांनी विमान नगर पोलीस ठाण्यात होणार हजर होण्यास सांगितलं आहे.

या विकृत घटनेनंतर गौतमीने व्हॅनिटी व्हॅन वापरण्यास सुरवात केली आहे.त्या व्हायरल झालेल्या विकृत घटनेने तिला खडबडून जाग केलं आणि तिने कार्यक्रमाला आता व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT