Mira Jagganath and Gayatri Datar file view
मनोरंजन

BBM 3: घरात मीरासमोर बुगुबुगु; घराबाहेर पडताच गायत्री तिच्याविषयी म्हणाली..

मीराच्या प्रत्येक गोष्टीत हो-हो करणाऱ्या गायत्रीचा स्वभाव प्रेक्षकांना खटकू लागला होता.

स्वाती वेमूल

अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) नुकतीच 'बिग बॉस मराठी ३'च्या (Bigg Boss Marathi 3) घरातून बाहेर पडली. 'तुला पाहते रे' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी गायत्री बिग बॉसच्या घरात चांगलीच चर्चेत राहिली. घरातून बाहेर पडल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायत्री तिच्या प्रवासाविषयी, टॉप ५ स्पर्धकांविषयी आणि बिग बॉस या कार्यक्रमाविषयी व्यक्त झाली.

शोमधील तिच्या प्रवासाबद्दल बोलताना गायत्री म्हणाली की, हे तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी काही दिवस होते. "मी बिग बॉस मराठी कुटुंबाचा एक भाग बनले, याचा मला खूप आनंद आहे. मी या शोमध्ये ८४ दिवस टिकून राहिले. मला माझ्या आयुष्यात नवनवीन, साहसी गोष्टींचा अनुभव घ्यायला आवडतो. हा त्यापैकीच एक भाग होता. मी घरात कॅप्टन बनले. प्रत्येक टास्कमध्ये भाग घेत मी परफॉर्म केलं. असा अनुभव आयुष्यात एकदाच येतो. मला वाटत नाही की दुसरीकडे कुठेही मला असा अनुभव घ्यायला मिळले", असं ती 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

टॉप ५ स्पर्धकांमध्ये कोण असू शकेल असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, "टॉप ५ मध्ये मी असेन असं मला वाटलं होतं. पण आता त्याआधीच मी बाद झाल्याने मीनल शाह त्यामध्ये असेल अशी मला खात्री आहे. ती परफेक्ट आहे. तिच्यासोबत विशाल निकम, विकास पाटील, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे पोहोचू शकतात."

बिग बॉसच्या घरात गायत्री नेहमी मीरा जगन्नाथसमोर बुगुबुगु करत असल्याचा आरोप झाला. मात्र घराबाहेर पडल्यानंतर गायत्रीने मीराविषयी वेगळंच मत व्यक्त केलं. "मला वाटत नाही की मीराने हा गेम अशा प्रकारे खेळला आहे की ती फिनालेपर्यंत पोहोचेल. मीराच्या तुलनेत घरात इतर चांगले स्पर्धक आहेत, ज्यांनी हा खेळ अत्यंत कुशलतेनं खेळला आहे. बिग बॉसच्या घरात असताना आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होतो. मात्र ती माझ्यामागे इतरांसोबत माझ्याबद्दल खूप काही बोलली. त्यामुळे तिच्यापासून अंतर राखूनच राहिलं पाहिजे असं मला वाटलं. त्यामुळे मी स्वतंत्र खेळू लागले", असं गायत्री म्हणाली.

बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच भांडणाचा सूर आणि दुसऱ्यांना कमी लेखण्याच्या स्वभावामुळे मीराने अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. मीराच्या प्रत्येक गोष्टीत हो-हो करणाऱ्या गायत्रीचा स्वभावसुद्धा प्रेक्षकांना खटकू लागला. मीराचा हेकेखोर स्वभाव आणि गायत्रीचा तिच्यासमोर बुगु बुगु करत नंदीबैलाप्रमाणे असलेला वावर पाहता सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी दोघींवर कडाडून ताशेरे ओढले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT