Israel Hamas War  esakal
मनोरंजन

Israel Hamas War : 'गाझापट्टीवरील हल्ले थांबवा', हॉलीवूड मधील ५० कलाकारांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र! आपले कलाकार मात्र...

आदरणीय बायडेनजी आणि जगभरातील सर्व मोठे नेते आम्ही तुम्हाला विनंती करतो की, सध्या पवित्र भूमीवर जे काही होते आहे हे तुम्हाला कळाले असेलच.

युगंधर ताजणे

Joaquin Phoenix To Cate Blanchett, Over 50 Celebs Urge US President : जगभरात त्या घटनेनं अनेकांना प्रश्नात पाडले आहे. तो प्रश्न आहे इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाचा. यामुळे सध्या गाझापट्टीमध्ये युद्ध सुरु झाले आहेत. त्यात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. जगभरातील कित्येक सेलिब्रेटींनी तो प्रश्न सुटावा म्हणून मध्यस्थीही केली आहे. पण त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही.

आतापर्यत बॉलीवूडमधील काही निवडक सेलिब्रेटींनी, यात जे नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या मुद्यांवर बोलत असतात त्यांनी इस्त्राईलचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या सगळ्यात हॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून त्याबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. आता या सगळ्यात बायडेन कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

हॉलीवूडमधील तब्बल ५० सेलिब्रेटींनी इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाबाबत ठामपणे भूमिका घेतली आहे. ती भूमिका सोशल मीडियावरुन अनेकांच्या कौतुकाचा विषय आहे. मात्र या सगळ्यात बॉलीवूडच्या कलाकारांनीही आपली भूमिका व्यक्त करावी. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर यापूर्वी कंगना, स्वरा भास्कर या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्या पन्नास हॉलीवूडच्या सेलिब्रेटींमध्ये ऑस्कर विजेता जोआक्विन फिनिक्स, केट ब्लँचेट, जॉन स्टुअर्ड, क्रिस्टन स्टुअर्ड, सुसान सरडॉन. माशिरा अली, रिच अहमद या सारख्या इतर कलाकारांनी बायडेन यांच्याकडे धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय विश्वात मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. त्यात मध्य पूर्व आशियातील संघर्षानं पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

आदरणीय बायडेनजी आणि जगभरातील सर्व मोठे नेते आम्ही तुम्हाला विनंती करतो की, सध्या पवित्र भूमीवर जे काही होते आहे हे तुम्हाला कळाले असेलच. याबाबत तुम्ही अधिक गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. जो काही हिंसाचार सुरु आहे त्याला आटोक्यात कसे आणता येईल आणि सलोखा कसा होईल याचा विचार करावा.

गाझापट्टीमध्ये जे सुरु ाहे त्यावरुन आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत याचे भान संबंधित देशांना करुन द्यावे. त्यात आपण पुढाकार घ्यावा. अशी विनंती त्या पत्रातून करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे ते पत्र व्हायरल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT