Geeta Kapur  Esakal
मनोरंजन

लग्न झाले? सिंदूर लावलेल्या फोटोवर गीताचा खुलासा

सोशल मीडियावर अनेकदा गीताच्या लग्नाची चर्चा होत असते.

प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका गीता कपूरने Geeta Kapur सोशल मीडियावर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. या फोटोमुळे ती सध्या चर्चेत आली आहे. फोटोमध्ये गीताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिने कपाळावर लावलेच्या सिंदूरने सर्वांचे लक्ष वेधले. गीताने सिंदूर लावल्याने तिचे लग्न झालंय का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. काहींनी कमेंट करत लिहिले, 'गीता मॉंने सिंदूर लावले, तिचे लग्न तर झाले नाही ना?' याबाबत गीताने आता एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.(Geeta Kapur responds to marriage rumours after pics of her wearing sindoor leave fans confused)

एका मुलाखतीमध्ये गीताने सांगितले, 'मी लग्न केले नाही. जर माझे लग्न झाले असते तर मी ते लपवून ठेवले नसते.' गीताने स्पष्ट केले की तिच्या आईचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे ती काही दिवस तरी लग्नाचा विचार करणार नाही. गीता सध्या 'सुपर डान्सर-4' या शोमध्ये परीक्षक आहे. या शोच्या शूटिंगदरम्यानचे हे फोटो असल्याचे तिने सांगितले. गीताने या शोच्या एका खास एपिसोडसाठी हा लूक केला होता. हा एपिसोड 'बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री' याविषयी होता. त्यामुळे गीताने अभिनेत्री रेखा यांचा लूक करायचे ठरवले होते. त्यामुळे तिने सिंदूर लावले. सिंदूरबद्दल बोलताना गीता म्हणाली,' मी याआधी देखील अनेक वेळी सिंदूर लावले आहे. मी शंकराची भक्त आहे. त्यामुळे मी दर सोमवारी पूजा झाल्यानंतर सिंदूर लावते. तसेच होळीला देखील मी सिंदूर लावते. त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट नवी नाही.'

गीताने तिच्या करिअरची सुरुवात वयाच्या 15 व्या वर्षी केली. फराह खानच्या बॉलिवूड डान्स ग्रुपमध्ये तिने भाग घेतला. गीताने 'दिल तो पागल है', 'कुछ कुछ होता है', 'कल हो ना हो', 'कभी खुशी कभी गम' या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये सहाय्यक नृत्य दिग्दर्शिकेचे काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT