deepika and sidhat chaturvedi  
मनोरंजन

Doobey Viral: डूबे'ची क्रेझ, दीपिका सिद्धांतचा 'गहराइया'

दीपिका पदुकोणसोबत या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहेत

युगंधर ताजणे

Gehraiyaan: अमेझॉन ओरिजिनल मूवी 'गहराइयां'चा साउंडट्रॅक हा या वर्षातील सर्वात प्रतिक्षित अल्बम पैकी एक आहे. टीझरमध्ये असलेला चित्रपटाचा टायटल ट्रॅक आधीच सोशल मीडियावर ट्रेंड करत असून ट्रेलरमध्ये आलेल्या 'डूबे'ने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीनच वाढवल्या आहेत मात्र आता, प्रतीक्षा संपली असून चित्रपटाच्या साउंडट्रॅकमधून 'डूबे' Doobey हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. Gehraiyaan first Song viral on social media

अंकुर तिवारी (Ankush Tiwari) यांच्या द्वारे डिजाइन करण्यात आलेले हे आकर्षक गीत कबीर कथपालिया उर्फ ​​ओएएफएफ आणि सवेरा यांनी रचले आहे. या गाण्याला कौसर मुनीर यांनी लिहिले असून लोथिका झा यांनी गायले आहे. या पहिल्या गाण्याबद्दल अंकुरनं सांगितलं की, “'गहराइयां'चे संगीत त्याच्या कथेसाठी योग्य असावे असे मला सुरुवातीपासूनच वाटत होते. जे प्रेक्षकांना या पात्रांच्या जगात घेऊन जाण्यास मदत करेल. कबीर, सवेरा आणि आमचे गीतकार कौसर, या सर्वांनी तरुणपणाचे सार जमवून आणण्याचे अभूतपूर्व काम केले आहे तसेच लोथिकाचा आवाज या गाण्यामध्ये योग्य प्रमाणात ताजेपणा आणि तीव्रता जोडतो."

दीपिका पदुकोणसोबत या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शहा आणि रजत कपूर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. धर्मा प्रोडक्शन्स, व्हायकॉम 18 आणि शकुन बत्राची जोउस्का फिल्म्स यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट फक्त अमेझॉन प्राइम व्हिडियोवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT