genelia deshmukh new movie trial period trailer out now starring manav kaul SAKAL
मनोरंजन

Genelia Deshmukh Trial Period: बाप भाड्याने हवा! जिनीलीया शोधतेय तिच्या लेकासाठी 'ट्रायल पिरियड'वर पप्पा!

जिनीलीया देशमुखच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्रायल पिरीयड असं या सिनेमाचं नाव असुन सिनेमाचा विषय एकदम हटके आहे.

Devendra Jadhav

Genelia Deshmukh Trial Period News: जिनीलीया डीसुजा देशमुखने या वर्षाच्या सुरुवातीला वेड सिनेमाच्या माध्यमातुन सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं. जिनीलिया आणि रितेशची वेड मधली जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

जिनीलिया वहिंनीना प्रेक्षकांनी पसंती दिली. अशातच जिनीलीया देशमुखच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्रायल पिरीयड असं या सिनेमाचं नाव असुन सिनेमाचा विषय एकदम हटके आहे.

(genelia deshmukh new movie trial period trailer out now starring manav kaul)

या चित्रपटात जिनीलिया सिंगल मदरची भूमिका साकारत आहे. तिचा मुलगा ३० दिवसांच्या चाचणी कालावधीसाठी नवीन वडिलांची मागणी करतो.

मुलाच्या आग्रहाला प्रतिसाद म्हणून, जिनीलिया नवीन वडीलांची नोकरी स्वीकारण्यासाठी उज्जैनहून शिस्तबद्ध प्रजापती द्विवेदीला घरी आणते, ज्याला प्रेमाने पीडी म्हणतात.

नवीन वडीलांची भूमिका मानवने केली आहे, जो आई आणि मुलाच्या अपेक्षांच्या अगदी उलट आहे. पुढे या सिनेमात प्रेम आणि मैत्रीची अनोखी कहाणी बघायला मिळचे. ही कथा कधी हसवते तर कधी विचार करायला लावते. 'ट्रायल पीरियड'च्या ट्रेलरने सर्वांची मनं जिंकली आहेत.

ज्योती देशपांडे निर्मित, जिओ स्टुडिओज, क्रोम पिक्चर्स प्रोडक्शन, हेमंत भंडारी, अमित रविंदरनाथ शर्मा आणि आलिया सेन प्रस्तुत, हा चित्रपट 21 जुलै रोजी JioCinema वर प्रदर्शित होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

दरम्यान जिनीलीया देशमुखचा वेड सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी वेडने हाउसफुल्लची पाटी झळकवली.

वेडला मिळणार प्रतिसाद बघून रितेशने वेड तुझा या गाण्याचं नवीन व्हर्जन आणि काही प्रसंग समाविष्ट करून वेडची नवीन कॉपी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वेड पाहायला गर्दी केली होती. वेड सध्या Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Supply: हॉटेलचे जेवण महागणार! व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; सर्वसामान्यांना झटका

तुमचे Google अकाउंट कोणत्या Unknown डिव्हाइसवर लॉगिन आहे? तपासून लगेच करा डिलीट..पाहा स्टेप-बाय-स्टेप गाइड

T20 WC, IND vs NZ: फायनलमध्ये अहमदाबादची खेळपट्टी कोणाला मदत करणार? समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

UPSC success story : यूट्युबवर ऑनलाईन व्हिडिओ पाहून कोल्हापूरच्या आरुषा पाटीलने युपीएसीमध्ये मिळवलं यश, तुम्हीही म्हणालं...

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT