Ghar Banduk Biryani nagraj manjule new marathi movie poster teaser release date 30 january cast sayaji shinde akash thosar sakal
मनोरंजन

Ghar Banduk Biryani: चांगभलं! या दिवशी येतोय.. नागराजचा 'घर बंदूक बिर्याणी' पोस्टर रिलीज..

नागराजचा हा सिनेमा मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालतोय..

नीलेश अडसूळ

Ghar Banduk Biryani: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी झळकला होता. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, पळापळी यात दिसत होती. त्यामुळे नेमके या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

हा चित्रपट येत्या ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटात नेहमीच वैविध्यपूर्ण आणि अनन्यसाधारण विषय हाताळले जातात. त्यांची हीच खासियत घेऊन झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो. या वेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन आलो आहोत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याबाबत विचारणाही होत होती. आता लवकरच या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

SCROLL FOR NEXT