मनोरंजन

Gharo Ghari Matichya Chuli: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आरोही साकारणार 'ही' भूमिका; याआधी 'या' मालिकांमध्ये केलंय काय

घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या प्रोमोत दिसणारी छोटी मुलगी कोण आहे? याविषयी देखिल प्रेक्षकांमध्ये कुतुहल होतं. प्रोमोत दिसणारी ही चिमुकली म्हणजेच बालकलाकार आरोही सांबरे.

priyanka kulkarni

Gharo Ghari Matichya Chuli: 18 मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली (Gharo Ghari Matichya Chuli) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोला भरभरुन प्रतिसाद मिळत असून मुख्य नायिका जानकीसोबत प्रोमोत दिसणारी छोटी मुलगी कोण आहे याविषयी देखिल प्रेक्षकांमध्ये कुतुहल आहे. प्रोमोत दिसणारी ही चिमुकली म्हणजेच बालकलाकार आरोही सांबरे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आरोही ओवीच्या भूमिकेत दिसेल. याआधी आरोही स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो, शुभविवाह आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून भेटीला आली आहे. आरोहीला अभिनयासोबतच नृत्याची आणि गाण्याची देखिल आवड आहे. यासोबतच आरोही बॉक्सिंग आणि कराटेचं देखिल प्रशिक्षण घेत आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेतली ओवी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती खुपच उत्सुक आहे.

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली.

'घरोघरी मातीच्या चुली'ची स्टार कास्ट

सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT