Gharoghari Matichya Chuli esakal
मनोरंजन

Gharoghari Matichya Chuli: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा पहिला एपिसोड पाहिल्यानंतर नेटकरी भडकले; म्हणाले, "एकदम टिपिकल..."

Gharoghari Matichya Chuli: घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Gharoghari Matichya Chuli: छोट्या पडद्यावरील घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला कालपासून (18 मार्च) सुरुवात झाली आहे. काल या मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पण काहींनी या मालिकेला ट्रोल देखील केलं आहेत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? जाणून घेऊयात...

स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये "कसा वाटला ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचा पहिला एपिसोड?", असं लिहिण्यात आलं आहे.या पोस्टला कमेंट करुन नेटकऱ्यांनी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या पहिल्या एपिसोडवर रिअॅक्शन दिली आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "एकदम टिपिकल, अजून तरी काही वेगळं नाही, सेम मोल्ड फक्त कलर वेगळा" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "पुन्हा पुन्हा, तेच तेच काही तरी नवीन आणा की", अनेक जण या मालिकेची तुलना कहानी घर घर की या हिंदी मालिकेसोबत देखील करत आहेत.

Gharoghari Matichya Chuli

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची स्टार कास्ट

घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये हृषिकेष रणदिवे ही भूमिका साकारली आहे. तसेच सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे यांनी देखील या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे.

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT